जाहिरात... Advertisement... विज्ञापन

पोंभूर्ण्यात भाजपाची सत्ता #BJP

१७ पैकी १० जागेवर भाजपा, शिवसेना ४, वंचित २ तर कांग्रेस फक्त एक
पोंभूर्णा :- माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचं कार्यक्षेत्र असलेल्या पोंभूर्णा येथील नगरपंचायत व्हाईट हाऊसमध्ये कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचीच उत्सुकता लागली होती.अनेकांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते.अखेर या निवडणुकीच्या रणांगणाचा निकाल जाहीर झालाय. पोंभूर्णा नगर पंचायत निवडणुकीत भाजपाने १७ जागांपैकी १० जागेवर विजय मिळवित बहूमत मिळवून पोंभूर्णा व्हाईट हाऊसवर आपला विजयी झेंडा फडकवला आहे.
चंद्रपुर जिल्ह्यातील पोंभूर्णा हे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचं कार्यक्षेत्र आहे. मुनगंटीवारांनी पाच वर्षांत पोंभूर्ण्यात विकासकामे करून तालुक्याचे रूप पालटले होते. विकासाचे रथ पुन्हा गतीमान करण्यासाठी पोंभूर्णा शहरवासीयांनी मुनगंटीवाराच्या विकास कामाला अधिक पसंती देत परत एकदा भाजपाला बहुमताने विजयीमताचा आशिर्वाद दिला आहे.
पोंभुर्णा नगर पंचायतीच्या १७ जागांपैकी १० जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. पोंभुर्ण्याच्या व्हाईट हाऊसमध्ये परत एकदा भाजपाचीच सत्ता असणार आहे. पोंभुर्ण्यात काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळविता आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ४ जागा लढविल्या होत्या त्यात वंचितने दोन जागेवर विजय मिळविला आहे. तर शिवसेनेने चार जागा जिंकल्या आहेत.
५०४९ एकूण मतदार असलेल्या पोंभूर्णा नगरपंचायतच्या निवडणुकीत १७ प्रभागासाठी ७९ उमेदवार रिंगणात होते.१७ प्रभागासाठी ४०९८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. १९ जानेवारी बुधवारला निवडणूकीचे निकाल जाहीर झाले यात भाजपाला १० जागा मिळाल्या तर कांग्रेसला मात्र एकच जागेवर समाधान मानावे लागले आहे. मागच्या वर्षी एकही खाता न खोललेल्या शिवसेनेने यावेळी चौकार मारला आहे.तर वंचितने दोन जागेवर विजय मिळवून आपली ताकत दाखवली आहे.


----------------------------------------
दर्शन व गणेश मधील लढत लक्षवेधी-

प्रभाग क्रमांक १७ कडे सर्वांचे लक्ष लागले होते. पोंभूर्ण्याच्या विकासात मोलाचे योगदान असलेले पोंभूर्णा नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष स्वर्गीय गजानन गोरंटीवार यांचे चिरंजीव दर्शन व शिवसेना शहर प्रमुख गणेश वासलवार यांच्यातील लढत लक्षवेधी होती. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात बहुमत घेऊन भाजपाचे दर्शन गोरंटिवार निवडून आले.


-------------------------------------
रणदिवे -कावटवारची लढत काटेकी टक्कर

- भाजपाचे मनोज रणदिवे व शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार यांच्यातील लढत म्हणजे काटेकी टक्कर होती.व्यापारीवर्ग विरूद्ध सामान्यवर्ग अशीच लढत होती.यात जनसामान्यात असलेल्या कावटवार यांना जनतेनी विजय मताचा आशिर्वाद दिला.

-------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत