जाहिरात... Advertisement... विज्ञापन

पंतप्रधान मोदींना शिवीगाळ प्रकरणी भाजपा आक्रमक #chandrapur

आ. नाना पटोले यांचेवर गुन्हा दाखल करा

महानगर भाजपाची मागणी
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना मारण्याची भाषा केली. या प्रकारामुळे भाजपाप्रेमींचेच नाहीतर समस्त देशबांधवांचे मन दुखावले आहे. मीडियात चर्चेत राहण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर उतरणे, हा लोकशाहीचा अपमान आहे. म्हणून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आ. नाना पटोले यांचेवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी, महानगर तर्फे पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून सोमवार (17जानेवारी) ला करण्यात आली.
यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, महासचिव ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, ऍड हरीश मंचलवार यांची उपस्थिती होती.
डॉ गुलवाडे म्हणाले,महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस चे अध्यक्ष व साकोली येथिल आमदार श्री. नाना पटोले यांनी रविवार (16जाने,2022 )ला साकोली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्वाच्य शिवीगाळ केली व "मी मोदींना मारूही शकतो" अशा प्रकारचे वक्तव्य करून भाजप कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. नाना पटोलेंच्या या घृणास्पद वक्तव्या बद्दल व देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केल्या बद्दल भाजपा त्यांच्या तीव्र शब्दात निषेध करते.
आ.नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार नोंदवुन गुन्हा दाखल करा. अन्यथा भाजपा आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत