सज्ज रहा, सतर्क रहा, काळजी घ्या!:- सुधीर मुनगंटीवार #chandrapur

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात अधिकारी- लोकप्रतनिधींची आढावा बैठक

चंद्रपूर:- "कोरोनाचं संकटं पुन्हा एकदा आमच्यासमोर उभं झालंय; या संकटाच्या काळात चंद्रपुर जिल्ह्यासह बल्लारपुर मतदार संघातील आरोग्य यंत्रणा सर्वच स्तरावर सज्ज असायला हवी. प्रशासनाने तातडीने सर्व उपलब्ध आरोग्य व्यवस्था, उणीवा आणि नियोजन यासाठी युद्ध पातळीवर कामाला लागावे; जेथे सरकार कमी पडेल तेथे लोकप्रतिनिधींनी पुढे यावे" असे कळकळीचे आवाहन विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. बल्लारशा विधानसभा मतदारसंघातील कोविड प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात प्रशासकिय अधिकारी, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती सदस्य यांची आभासी समन्वय बैठक घेऊन सुधीर मुनगंटीवार अनेक उपयुक्त सूचना केल्या.
मतदार संघातील आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय येत्या काळात परिपूर्ण असावेत; व्हेंटिलेटर, ऑक्सीजन काँसंट्रेटर, रुग्णवाहिका, पिपिई किट्स, ऑक्सीजन प्लांट इत्यादी अत्यावश्यक सेवांची सद्यस्थिती काय आहे आणि कोणत्या तालुक्यात कशाची कमतरता आहे हे सुधीर मुनगंटीवार यांनी बारकाईने जाणून घेतले. प्रशासकिय अधिका-यांनी व्यवस्थेत कुठेही कुचराई न करता सतत अलर्ट मोडवर राहून वेळोवेळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या संपर्कात रहावे आणि सर्वसामान्य माणसाचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी, प्राण वाचविण्यासाठी अत्यंत संवेदनशीलपणे काम करावे असे आवाहन केले.
लोकप्रतिनिधींनी झोकून द्यावे!

ज्या मतदारांनी मोठ्या विश्वासाने जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत, पंचायत समिती सदस्य म्हणून किंवा आमदार म्हणून आपल्यावर जबाबदारी टाकली आहे, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे; प्रशासन आणि जनता यातील महत्वाचा दुवा म्हणून लोकप्रतिनिधींनी काम करायला हवे. कोरोनासारख्या महासंकटाच्या वेळी आपण योद्ध्याप्रमाणें सज्ज राहून, "जेथे सरकार कमी, तेथे आम्हीं" हे कायम लक्षात ठेवावे असे भावनिक आवाहन देखील बैठकीत केले. मास्क चा वापर, सार्वजनिक स्वच्छता आणि गर्दीपासून लांब राहण्यासाठी समाजातील प्रमुख घटक म्हणून जनतेला वारंवार आवाहन करावे असेही त्यांनी सुचविले.
या बैठकीला जिल्हा भाजपा अध्यक्ष देवराव भोंगळे , जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ संध्या गुरनुले , बल्लारपुर चे नगराध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी , मूल, बल्लारपुर नगर परिषद आणि पोम्भूर्णा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी , जिल्हा परिषद सदस्य संजय गजपूरे यांच्यासह जिप सदस्य, नगरसेवक आदिंची उपस्थिति होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत