अनाथांची माय होऊन त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका, पद्मश्री सिंधुताई सपकाळ (७५) यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत समाजकार्याचा एक वेगळा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला.
अनाथांची माय हरपली!
👇👇👇👇👇
सिंधुताई प्रामाणिकपणे काम करत राहिल्या. जगभरात त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली. त्यांच्या अचानक जाण्याने प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे, अशा शोकभावना चंद्रपूरच्या महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी व्यक्त केल्या.