पत्तीने पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत जाळले #fire

मुल तालुक्यातील सुशी येथील घटना
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
मुल:- पत्नीच्या चारीत्र्यावर नेहमीच संशय घेणाऱ्या वृध्द इसमानी आपल्या पत्नीचे शरन रचुन जाळुन टाकल्याची घटना मूल तालुक्यातील सुशी येथे मंगळवारी दुपारी 2 वाजता दरम्यान घडली. जळलेल्या अवस्थेत नागरीकांनी उपचारार्थ नागपूर येथे नेत असताना वाटेतच प्राणज्योत मावळली. मुक्ताबाई गंगाराम शेडे वय 65 वर्षे असे मृत्त पावलेल्या महिलेचे नांव आहे तर गंगाराम सोमाजी शेडे वय 74 वर्षे असे आरोपीचे नांव आहे.
मूल तालुक्यताील सुशी येथील मुक्ताबाई गंगाराम शेंडे वय 65 वर्षे या मंगळवारी सकाळच्या सुमारास सरपणासाठी गेल्या होत्या, परत आल्यानंतर मुक्ताबाई आणि गंगाराम मध्ये सरपणाला गेल्यावरून वाद झाला, गंगाराम शेंडे हे पत्नी मुक्ताबाई हिच्या चारीत्र्यावर नेहमीच संशय घेत होता, 
यावेळी गंगाराम याने पत्नीला बेदम मारहाण करून मुक्ताबाईच्या अंगावर डिेझेल टाकुन आग लावली जळलेल्या अवस्थेत मुक्ताबाईने वाचविण्यासाठी आरडाओरड केल्याने गावकऱ्यांनी तिला चंद्रपूर येथे उपचारार्थ नेले, तिच्या वर प्राथमिक उपचार करून नागपूर येथे नेत असताना वाटेतच तिची प्राणज्योत मावळली.
आरोपीवर मूल पोलीसांनी कलम 326, 302 अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास मुल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुरषोत्तम राठोड करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत