Top News

पोंभूर्ण्यात महाराणा प्रताप पुण्यतिथी साजरी #pombhurna


पोंभूर्णा:- हिंदू क्रांतीसुर्य महापराक्रमी योद्धा महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त पोंभूर्णा येथे मुर्ती पुजन करून अभिवादन करण्यात आले. भारतामध्ये मुघल साम्राज्याच्या विस्तारवादाविरुद्ध उभे ठाकलेले महाराणा प्रताप हे पहिले स्वातंत्र्यता सेनानी म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म ९ मे १५४० साली झाला. महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील क्षत्रिय राजपूत राजे होते. १५७२ साली महाराणा प्रताप हे मेवाडचे राजे झाले होते, उदय सिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर जबाबदारी आली आणि राजस्थानच्या मेवाडचे १३ वे राजपूत राजे बनले होते. १९ जानेवारी १५९७ ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
यावेळी पोंभूर्णा तालूका जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा महाराणा प्रताप स्मारक समीतीचे अध्यक्ष गिरिधरसिंह बैस यांची यावेळी उपस्थिती होती. त्यांनी उपस्थितांना महाराणा प्रताप यांच्या कार्यावर व विरतेच्या संबंधीत मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या मुर्तीचे पुजन व माल्यार्पण करून अभिवादन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने