जमीन खरेदी विक्रीसाठी पुनर्वसन विभागाच्या परवानगीची अट रद्द करा:- विनोद देशमुख #pombhurna


पोंभूर्णा:- गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाण्याचे लाभ घेणाऱ्या पोंभूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना आपली जमीन खरेदी विक्री करण्यासाठी पुनर्वसन विभागाच्या परवानगी घेण्याची जी अट लावण्यात आली आहे ती अट रद्द करण्यात यावी यासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती विनोद देशमुख यांनी मागणी केली आहे.
राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर जे गाव पुनर्वसीत होते व जे गाव उठविण्यात आले होते तेथील शेतकऱ्यांना आपली जागा खरेदी विक्री करण्यासाठी व बक्षीसपत्र करण्यासाठी पुनर्वसन विभागाची परवानगी बंधनकारक करण्यात आले होते.जे गाव या प्रकल्पामुळे उठविण्यात आली होती त्या गावांनाच सदर अट लागू होती.
पोंभूर्णा तालुक्यात गोसेखुर्दचा पाणी शेतकऱ्यांना शेतीउपयोगासाठी फक्त वापर करण्यासाठी येतो. पोंभूर्णा तालुक्यातील कोणतेही गाव या प्रकल्पामुळे उठविण्यात आले नाही. किंवा ते पुनर्वसीत नाहीत तरी पोंभूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनी खरेदी विक्रीसाठी पुनवर्सन विभागाची परवानगी घेऊनच जमीनीचा व्यवहार करावा लागत आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना जमीनीची खरेदी विक्री करण्याकरीता मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. परवानगी करीता गेलेल्या फायली ६ ते ८ महिणे पुर्नवसन विभागामध्ये नुसती पडुन असतात. त्यामुळे शेतक - यांना जमीनीची खरेदी विक्री करता येत नाही.किंवा मुलांना बक्षीसपत्र सुध्दा करता येत नाही.शेतीचा व्यवहार करण्यासाठी पुनर्वसन विभागाची जी परवानगी मागविण्यात येत होती ती परवानगी पोंभूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी रदद करण्यात यावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती विनोद देशमुख यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने