जाहिरात... Advertisement... विज्ञापन

पंतप्रधान मोदींना मारण्याची भाषा करणाऱ्या नाना पटोलेंवर कार्यवाहीची मागणी #pombhurna

भाजपा तालुका पोंभूर्णा चे तहसिलदारांना निवेदन
पोंभूर्णा:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या आ. नाना पटोले यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी तालुका भाजपा पोंभूर्णा यांनी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष तथा साकोली (जि. भंडारा) येथील आमदार नाना पटोलेनी १६ जानेवारी २०२२ रोजी भंडारा जिल्हात सुरु असलेल्‍या जिल्‍हा परिषद व पंचायत समिती निवडणूकी दरम्यान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना अर्वाच भाषेत शिवीगाळ केली. पंतप्रधान हे संविधानीक पद असून संपूर्ण देशाचे नेतृत्व करतो.
पंतप्रधानाविरोधात असे बोलणे अत्यंत निंदनीय आहे. नाना पटोलेंच्या या द्वेषपूर्ण वक्तव्याचा भाजपा निषेध करीत असून नाना पटोले च्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे
यावेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम, अजित मंगळगिरीवार, ईश्र्वर नैताम, ऋषी कोटरंगे, लक्ष्मण कोडापे, नंदू तुम्मुलवार, महेश रणदिवे, श्र्वेता वनकर, दर्शन गोरंटिवार आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत