चेक फुटाना ते चेक नवेगाव रस्त्याचे भुमि अधिग्रहन झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला द्यावा #pombhurna

Bhairav Diwase
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना घेऊन वंचित बहुजन आघाडी ने दिले निवेदन
(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर 
पोंभुर्णा:- चेक फुटाना ते चेक नवेगाव या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे.या रस्त्यासाठी परीसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या परंतु त्यांना त्यांचा आर्थिक मोबदला मिळाला नसल्याने तो देण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी ने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
चेक फुटाना ते चेक नवेगाव या रस्त्याचे बांधकाम मागील तिन वर्षांपासून सुरू आहे.या रस्त्यासाठी परीसरातील शेतकऱ्यांचे जमीन मोजणी करून अधिग्रहीत करण्यात आली.जमीन मोजणी नंतर त्यांना मोबदला मिळायला हवा होता परंतु ते आजपर्यंत मिळाला नाही.त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना अधिग्रहीत झालेल्या जमिनीचा आर्थिक मोबदला द्यावा यासाठी वंचित बहुजन आघाडी ने शेतकऱ्यांना घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.जर येत्या काळात मोबदला मिळाला नाही तर वंचित बहुजन आघाडी कडुन शेतकऱ्यांना घेऊन जमीन परत घेण्याचा इशारा हि निवेदनातून दिला आहे.
निवेदन देताना सम्यक विद्यार्थी आंदोलन चे तालुका अध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य लोकेश झाडे, वंचित बहुजन आघाडी चे युवा नेते रुषी ईबिदिवार, शेतकरी रामदास अर्जुनकर,ईश्वर पिंपळकर, ईश्वर ढुमने,मोतिराम बोरीकर, मारोती खेळेकर, विठ्ठल अर्जुनकर, बाबुराव निमकर,नेमुजी वाकुडकर, सुनिल गौरकार, जितेंद्र ढुमणे, प्रभाकर रामगिरकार, रामदास झोडे,अनील येरमे प्रकाश कामटकर , वंचित बहुजन आघाडी युवा अध्यक्ष अतुल वाकडे,विजय उराडे, अविनाश कुमार वाळके,अजय उराडे, हेमचंद उराडे, व असंख्य शेतकरी उपस्थित होते.