जाहिरात... Advertisement... विज्ञापन

वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार #tiger #tigerattack

वाघाच्या दहशतीने नववर्षाची सुरुवात
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सावली तालुक्यातील वनविकास महामंडळ पाथरी अंतर्गत येत असलेल्या जनकापूर रिठ येथील गुराखी श्री विनोद नामदेव ठाकरे वय 48 वर्ष हे आज सकाळी गावातील गुरे चराई करिता जंगलात गेले असता. कान्हाळगाव रस्त्याच्या बाजूला दबा धरून असलेल्या वाघाने गुरख्यावर कंपार्टमेंट न. 147 हल्ला करून जागीच ठार केले. जनकापूर रिठ गावाला लागूनच असलेल्या जंगलात ही घटना घडली.
 मृत व्यक्तीच्या कुटुंबात 2 मे, पत्नी आणि सासू असा परिवार आहे घरची परिस्थिती बिकट असून मोलमजुरी करून कसे बसे कुटुंब चालवायचे परंतु घरचा कमावताच धनी गेल्यावर त्याचा कुटुंब कसा चालेल असा प्रश्न पडतो.
वनविभागाने घटनास्थळी दाखल होऊन सदर घटणेचा पंचनामा करून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आव्हान वनविभागाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत