Top News

चितळाच्या शिकारातील तीन आरोपीना अटक #arrested #forestdepartment

विरूर वनपरिक्षेत्राची कारवाई
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- राजुरा सुमठाणा फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात झाल्यामुळे चितळाचा मृत्यू झाला. सुबई इंदिरानगर येथील व्यक्तीनी चितळाचे मास कापून आणल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली.
राजुरा तालुक्यातील येत असलेल्या राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत सुमठाना-जोगापुर जंगलात जास्त प्रमाणात चितळाचा नेहमीच वावर असतो. त्यातच राजुरा आशिफाबाद राज्य महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा मृत्यू झाला. विरुर वनपरिक्षेत्रात बांबू कटाई चालू असल्यामुळे राजुरा डेपोत बांबू जमा करण्यासाठी गेले असता परत येत असताना मारोती कडांबे यांना चितळ मृत अवस्थेत दिसून आले. याबाबत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन चितळाचे मास कापून घरी आणल्याचे दिनांक 13 फेब्रुवारी 2022 ला दुपारी 1 वाजता याची गोपनीय माहिती विरूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे यांना मिळाली त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह सुबई इंदिरानगर मारोती कडांबे यांच्या घराची झडती घेऊन पहानी केली असता चितळाचे मास गंजामध्ये मिळाले. यातील तीन आरोपींना ताब्यात घेऊन हिरो होंडा कंपनीची दुचाकी गाडी, वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आले. यातील आरोपी राहूल बालाजी कोडापे वय 17, मारोती कारू कडांबे वय 50, संजय रामचंद्र लोखंडे वय 27, हे सर्व रा. सुबई इंदिरानगर येथील असून आरोपीवर वन्यजीव 1972 संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले.
घटनेचा पुढील तपास उपवनसंरक्षक अरविंद मुंडे उपविभागीय वनाधिकारी अमोल गर्कल यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने