Top News

महाराष्‍ट्राला "उडता महाराष्‍ट्र" करू नका:- अंजली घोटेकर #chandrapur #BJP


किराणा दुकानात दारू विक्रीस परवानगी देणा-या आघाडी सरकारच्‍या निषेधार्थ भाजपा महिला रस्‍त्‍यावर
चंद्रपूर:- भाजपा महिला मोर्चा चंद्रपूर महानगरतर्फे स्‍व. सुषमा स्‍वराज यांच्‍या जयंती प्रित्‍यर्थ आ. सुधीर मुनगंटीवार अध्‍यक्ष लोकलेखा समिती व उमाताई खापरे प्रदेशाध्‍यक्षा महाराष्‍ट्र प्रदेश यांच्‍या मार्गदर्शनात व अंजली घोटेकर, भाजपा महिला आघाडी जिल्‍हाध्‍यक्ष चंद्रपूर महानगर यांच्‍या नेतृत्‍वात महाराष्‍ट्र शासनाच्‍या आघाडी सरकारचा तिव्र निषेध करीत ‘किराणा दुकान व मॉल’ मध्‍ये मद्यविक्रीस देण्‍यात येणाऱ्या परवानगी बाबत तिव्र संताप व्यक्त करून नारेबाजी करण्‍यात आले.
यावेळी बोलताना अंजली घोटेकर म्‍हणाल्‍या की आघाडी बिघाडी सरकारचे डोके ठिकाणावर नाही. म्‍हणून अश्‍या प्रकारचे निर्णय घेऊन तरूण-तरूणींना व्‍यसनाधीन करण्‍याचे निर्णय घेत आहेत. देशाचे पंतप्रधान देश मजबुत करण्‍यासाठी युवकांना प्रेरणा देतात पण महाराष्‍ट्रातील आघाडी सरकार महाराष्‍ट्राला ‘उडता महाराष्‍ट्र’ करीत आहे. किराणा आणण्‍यासाठी घरचा माणूस गेला तर त्‍यांची मुलेही सोबत असते असे बापाला दारू पिताना पाहून त्‍यालाही वाटेल की आपले वडील ते पीत आहे ते चांगलेच असेल म्‍हणून तो ही ते पिण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही व अश्‍याने तरूण पिढी ही व्‍यसनाधीन होईल. विद्यालय सुरू न करता मद्यालय सुरू करून हे सरकार काय साधणार आहे हेच कळत नाही. यानंतर महानगर महीला महामंत्री सौ. शिला चव्‍हाण यांच्‍या नेतृत्‍वात महिला आयोग अध्‍यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांना या विषयीचे १०० पोस्‍टकार्ड पत्र पाठवून तिव्र शब्‍दात संपात व्‍यक्‍त केला गेला व ह्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अन्‍यथा पुन्‍हा महिला रस्‍त्‍यावर उतरल्‍या शिवाय राहणार नाही अशी चेतावनी ही यावेळी देण्‍यात आली.
या मोर्चाला महिला मोर्चाच्‍या चंद्रपूर महानगर जिल्‍हाध्यक्षा सौ. अंजली घोटेकर, सौ. शिला चव्‍हाण, सौ. प्रज्ञा बोरगमवार, सौ. माया उईके, सौ. मंजुश्री कासनगोट्टूवार, सौ. शितल गुरनुले, सौ. पुष्‍पा उराडे, सौ. किरण बुटले, सौ. रेणु घोडेस्‍वार, कु. मनिष महातव, ह.भ.प. निर्मला लेनगुरे, सौ. मनिषा साखरकर, सौ. मोनाली कोसे, राणी कोसे, श्रीमती लिलावती रविदास, सौ. सिंधु राजगुरे, सौ. सरिता उईके, सौ. माया बुरडकर, कविता नरसुलवार, अमेरिका साहू यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने