Top News

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्राने खुलल्या वाटा #chandrapur

नामांकित धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुबंई येथे सत्यवान कांबळे यांच्या हृदयावरील शस्त्रक्रिया पार
तीन वर्षांपासून छातीत असह्य वेदना होत होत्या, स्थानिक डॉक्टरांचे उपचार व वारंवार औषधी घेऊनही त्यावर उपाय होत नव्हता, एकीकडे वाढत जाणाऱ्या वेदना आणि कुटुंबप्रमुखांच्या काळजीने धास्तावलेले कांबळे कुटुंब... शस्त्रक्रियेशिवाय दुसरा उपाय नाही आणि त्या शस्त्रक्रियेसाठी साधारण ३ लक्ष रुपये खर्च येणार हे कळताच , कांबळे कुटुंबात निराशा पसरली.

शेवटी आर्थिक मदत कोण करणार ? असा प्रश्न होता, त्यावेळी मनापासून जनतेचा विचार करणारा विशाल हृदयाचे लोकनेते आ.सुधीर मुनगंटीवार धावून आले अन् सत्यवान कांबळे यांची नामांकित कोकिळाबेन धीरूभाई अंबानी ,अंधेरी मुबंई येथे छातीमधील वॉलची शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली अन कांबळे कुटुंब सुखावले.
गोंडपीपरी तालुक्यातील चेकनांदगाव येथील रहिवाशी सत्यवान कांबळे हे छातीच्या वेदनेमुळे मागील तीन वर्षांपासून त्रस्त होते , चंद्रपूर येथील त्यांनी दवाखान्यात दाखवले पण वारंवार औषधी घेऊनही इलाज होत नाही. त्यावेळी त्यांनी मुबंई गाठली .
अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थिती अनेकांच्या मदतीने तो मुबंई पर्यत पोहचले, मुबंई त्यांनी सायन या नामांकित दवाखाण्यात उपचार करताना त्याच्या छातीतील वॉल मध्ये एक छिद्र आहे हे निदान झाले, व त्यावर शस्त्रक्रिया हा एकमात्र उपाय आहे हे डॉक्टर कडून रुग्ण सत्यवान कांबळे यांना कळाले. या शत्रक्रियेसाठी एकूण खर्च किती येणार हे सत्यवान कांबळे यांच्या पत्नीने डॉक्टरांना विचारले , डॉक्टरांनी ३ लक्ष रुपये एकूण उपचारासाठी खर्च येणार हे कळताच कांबळे कुटुंब पैशाअभावी त्यांनी उपचार अर्ध्यावर सोडून आपले घर गाठले.
रोजच्या असह्य वेदननेचा त्रास सहन करत वर्षे गेले मात्र वेदना दिवसागणित वाढतच होत्या, आर्थिक मदत अनेकांना मागितली पण कुणीही मदत करायला तयार नव्हते , त्यावेळी धाबा येथील ठाणेदार सुशील ढोकटे यांना कांबळे कुटुंबाने आता पर्यंतची घडलेला प्रसंग व आर्थिक अडचण सांगितली , ठाणेदार सुशील ढोकटे यांनी फोनवरून आमदार सुधीर मुनगंटीवार यांना सत्यवान कांबळेच्या उपचाराबद्दल विनंती केली. आर्थिक अडचण लक्ष्यात घेत आ.सुधीर मुनगंटीवार यांनी काळजी करू नका मी सोबत आहो म्हणत ढोकटे यांना आश्वस्त केले .
संवेदनशील आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पत्र लिहून कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या विश्वस्तांना पत्राद्वारे मोफत इलाज करण्यासाठी विनंती केली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्राची दखल घेत अंबानी विश्वस्तांनी मुबंईत हॉस्पिटलमध्ये मोफत इलाजाकरिता सत्यवान कांबळे यांना दाखल करून घेतले.
सत्यवान कांबळेवर यशस्वी शत्रक्रिया पार पडली , त्यामुळे आमदार सुधीर मुनगंटीवार हे देवदूतासारखे धावून आले त्याबद्दल आ.सुधीर मुनगंटीवार व ठाणेदार सुशील ढोकटे यांचे कांबळे कुटुंबाने आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने