Top News

तीस वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली हिवरा सेवा सहकारी संस्थेवर भाजपाचा झेंडा #gondpipari

बिनविरोध अध्यक्षपदी दिनेश कुत्तरमारे तर उपाध्यक्षपदी विलास नागापुरे यांची निवड
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या सहकारी क्षेत्रातील सेवा सहकारी संस्था हिवरा र.जी. १६४८ मध्ये दिनांक ३० जानेवारीला पार पडलेल्या निवडणुकीत १३ पैकी ११ जागा भारतीय जनता पार्टी प्रणित आदर्श शेतकरी विकास आघाडीने जिंकून सहकार क्षेत्रात आपले वर्चस्व राखले. हिवरा येथील सरपंच निलेश पुलगमकर यांच्या नेतृत्वात ही निवडणूक पॅनल लढवली.
मागील तीस वर्षांपासून अविरत सत्ता असलेल्या काँग्रेसप्रणीत मुंजनकर गटाचा दारुण पराभव झाला असून त्यांचे केवळ दोन जागेवर उमेदवार विजयी झाले. त्यात एका जागेवर मुंजनकर गटाने ईश्वर चिठ्ठीने विजय मिळवला तर एक जागा केवळ एक मताने जिंकता आली. हिवरा सेवा सहकारी संस्थांमध्ये मागील तीस वर्षापासून काँग्रेसप्रणित मुंजनकर गटाचे वर्चस्व होते. अनेकदा निवडणुका अविरोध जिंकून मागील ३० वर्ष हिवरा येथील सहकार क्षेत्रात सत्ता स्थापन करण्यात ते यशस्वी झाले. मात्र त्यांच्या सुमार कामगिरी मुळे मतदारांनी त्यांना चांगलाच धक्का दिला. शेतकऱ्यांना आवश्यक वेळी पीक कर्ज वाटप न केल्याने कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी निलेश पूलगमकर यांच्या नेतृत्वात आदर्श शेतकरी विकास आघाडी पॅनल ला बहुमत देत मुंजनकर यांना सत्तेपासून कोसो दूर ठेवले.
आज अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाकरीता दिनांक 24 फेब्रुवारीला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गोंडपिपरी येथे निवड प्रकिया पार पडली. त्यात आदर्श शेतकरी आघाडी पॅनलचे दिनेश उद्धवराव कुत्तरमारे यांची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर विलास तामदेव नागापुरे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर सदस्य पदी निलेश पुलगमकर, विलास कुत्तरमारे, सुधाकर हिवरकर, चांगदेव सहारे, शांताराम मेश्राम, सिंधुबाई कुत्तरमारे, ज्ञानेश्वर लखमापूर, कचरू डोंगरे, शंकर ठाकूर यांची निवड करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने