उमरखेड येथिल हत्या प्रकरणी लोकस्वराज्य आंदोलन #jivati

जिवती तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील मातंग समाजाचे प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.हनुमंत धर्मकारी यांची विकृत बुध्दीच्या वेक्तीने दिवसा ढवळ्या गोळ्या घालून हत्त्या केली त्या नराधमाला तत्काल अटक करुन दोषीना फाशीची शिक्षा देण्यात यावी व सदर प्रकणाची एस.टि.आय. मार्फत चौकशी करण्यात यावी जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पट्याचा प्रश्न तात्काल निकाली काढण्यात यावा आदी मागणी सोबत लोकस्वराज्य आंदोलन व सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आबेडकर भवनापासुन पाई रॅली काढत जिवती तहसील कार्यालयवर आक्रोश मोर्चा काडुन जिवती तहसीलदाराना निवेदन देण्यात आले.
या वेळी लोकस्वराज्य युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष मा. दत्तराज गायकवाड त्र्यंबक सूर्यवंशी तानाजी काबंळे बालाजी शिवमोरे अक्षर डकरे शिलवंत गायकवाड कृष्णा मोरे व्यकंटी कोटंबे शाहिर संभाजी ढगे शाहिर अकुंश मोरे गजानन गायकवाड आषिश गायकवाड जिवन तोगरे प्रा. बालाजी मोरे सौ.इंदुताई काकडे लताताई डकरे आशाताई गोडांबे सरुबाई शिंदे संगीता पलमेटे सुकूमारबाई दुधगोंडे काशीबाई हरगीले हारुबाई मोतेवाड यांच्या नेतृत्वात प्रचंड आक्रोश मोर्चा काढण्यात आला या वेळी लोकस्वराज्य आंदोलन पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या