Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

युवा मोर्चा ने दिला दिव्यांग भगिनीला मदतीचा हात #Jivati

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- तालुक्यातील लिंगनडोह गावातील भाजपा युवा मोर्चाचे युवानेते संतोष राठोड यांच्या पुढाकाराने सुनीता किशन पवार या दिव्यांग भगिनीला आर्थिक संकट ओढवले होतं अशातच तिने गावातील नेहमी समाज सेवेमध्ये पुढाकार घेणारे संतोष राठोड यांच्याशी संपर्क केला.
  वेळ न गमावता संतोष राठोड यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क केला. तसेच राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲड. संजय धोटे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे, महेशजी देवकते यांच्या मदतीने सुनीता पवार यांना आर्थिक मदतीचा हात दिला व यानंतरही कोणती अडचण आल्यास भाजपाचे सर्व पदाधिकारी मदतीला सज्ज आहे असा विश्वास दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत