Click Here...👇👇👇

गडचांदूर मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी #Korpana

Bhairav Diwase

अभिनव सामाजिक संस्था,तसेच क्रिसिल फाऊंडेशन च्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ व जेष्ठ नागरिकांचा आणि समाजसेवकांचा सत्कार

कोरपना:- गडचांदूर मध्ये शिवजयंतीनिमित्त वेगवेगळ्या विभागांमध्ये समाजकार्याच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या सर्व समाजसेवकांचा या ठिकाणी तसेच ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आणि सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक अंगणवाडी सेविका आशा वर्कर सेवानिवृत्त शिक्षक सेवानिवृत्त सैनिक अशा नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

यामध्ये शिवजयंती उत्सव समिती अभिनव सामाजिक सस्था तसेच क्रीसिल फाउंडेशन च्या माध्यमातून बँकेमधून मिळणाऱ्या विविध शासकीय योजना बाबत माहिती देण्यात आली त्यांना मार्गदर्शन करण्यात आले व प्रभागांमधील समाजसेवकाचा व ज्येष्ठ नागरिकांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला यावेळी शासकीय योजना तसेच मनी वाईज क्रिसिल फाउंडेशन च्या माध्यमातून प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना तसेच इ श्रम कार्ड बँकेतील बचत गुंतवणूक तसेच डिजिटल बँक व्यवहार व त्यापासून त्यामध्ये सुरक्षा कशी करावी आणि बँकेच्या एकूण कार्यप्रणालीच्या बाबतीत यावेळेस मार्गदर्शन करण्यात आले.

मार्गदर्शक विठ्ठल नवले सेंटर मॅनेजर तसेच फिल्ड समनव्यक अतुल गोरे यांनी लोकांना मार्गदर्शन केले. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे समाजसेवक यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आला व अभिनव सामाजिक संस्था तसेच शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यात आला.

या वेळेस उपस्थित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नगर परिषद च्या नगराध्यक्ष सौ सविता ताई टेकाम तसेच माजी उपनगराध्यक्ष सचिन भाऊ भोयर समाजसेवक मनोज भाऊ भोजेकर प्रभाग क्रमांक पाच मधील नगरसेवक अरविंद भाऊ मेश्राम तसेच नगरसेविका मीनाक्षीताई एकरे विठ्ठल पाटील गोरे महादेव पाटील एकरे सुरेखाताई गोरे   सुधाकर भाऊ ताजणे यावेळी यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा व समाज सेविकांचा यावेळी शाल श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 या संपूर्ण  कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन संतोष भाऊ महाडोळे यांनी केलं तर प्रास्ताविक अतुल भाऊ गोरे यांनी केलं व आभार प्रदर्शन सतीश बिडकर मयूर एकरे यांनी मानलं संपूर्ण कार्यक्रमाचे धुरा सांभाळणारे शिवजयंती उत्सव समिती गडचांदूर चे सर्व सदस्य संजू भाऊ चिकटे तुकाराम चिकटे पवन ताजने बादल पेचे मेघराज एकरे आदित्य मंगरूळकर इतर सर्व लोकांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले.