Top News

लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून #murder

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
नागभीड:- नागभीड तालुक्यातील तळोधी बाळापुर येथील भट्टी वार्ड क्रमांक 4, झेंडा चौक येथे आज भावानेच पूर्ववैमनस्यातून मोठ्या भावाचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, मृतक राजेश्वर भिवाजी जुमडे (65) याचा खून त्याच्याच लहान भाऊ बंडू भिवाजी जुमडे(62) याने केल्याची घटना आज दुपारी 12:30 ला उघडकीस आली. हा खून त्याने दगडाने डोका ठेचून केला, राजेश्वर चे घटनास्थळी मृत्यू झाले.
घटनेची माहिती मिळताच तळोधी बाळापूर येथील ए.पी.आय, डि.आर. शेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली, मोक्का पंचनामा करून शव विच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे पाठविण्यात आले. अधिक तपास पि.एस.आय, आकाश कुमार साखरे, सहाय्यक फौजदार बलदारखा पठान, हवालदार पानसे, हवालदार आंबेकर, पो.कांस्टेबल निंबेकर इतर,हे करीत आहेत.घटनेची माहिती मिळताच तळोधी बाळापूर येथील ए.पी.आय, डि.आर. शेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली, मोक्का पंचनामा करून शव विच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे पाठविण्यात आले. अधिक तपास पि.एस.आय, आकाश कुमार साखरे, सहाय्यक फौजदार बलदारखा पठान, हवालदार पानसे, हवालदार आंबेकर, पो.कांस्टेबल निंबेकर इतर,हे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने