मार्कंडा व चपराळा यात्रेबाबत मोठा निर्णय #gadchiroli

Bhairav Diwase
गडचिरोली:- विदर्भाची काशी मार्कंडा आणि चपराळा देवस्थानच्या महाशिवरात्रीच्या यात्रा या वर्षी नियोजित वेळी होणार असल्याची माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिली असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी बैठकीला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार मारोतराव कोवासे, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, मार्कंडा देवस्थान समितीचे अध्यक्ष गजाननजी भांडेकर, मार्कंडा व चपराळा देवस्थान समितीचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
मागील दोन वर्षापासून कोरोना मुळे यात्रा होऊ शकली नाही, माञ यावर्षी यात्रा व्हावी अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा असल्याचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी या बैठकीत बोलून दाखवले. सर्वसामान्य लोकांच्या भावनांचा आदर करीत जिल्हाधिकारी यांनी या यात्रांना मंजुरी दिली असून जिल्ह्यातील जनतेने या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे.