पोंभुर्णा येथे कला पथकाच्या माध्यमातून कोरोना जनजागृती#pombhurna

Bhairav Diwase
पोंभुर्णा:- माहिती व जनसंपर्क महा संचालय महाराष्ट्र राज्य,जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूर, आणि लोकजागृती नाट्य कला सांस्कृतिक संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पोंभुर्णा व तालुक्यातील गावा गावात जाऊन कोरोना या विषयावर जनजागृतीचा संदेश दिल्या जात आहे.
गेल्या तीन वर्षांपासून कोरोना या महामारीने थैमान घातले असून कोरोनामुळे अनेकांचे रोजगार हिरावले आहेत ,अशातच समाजामध्ये सुद्धा अनेक गैरसमज,समज पसरले आहेत. अशातच समाजात जनजागृती व्हावी,आणि कोरोना संदर्भातील शासनाने दिलेले नियम सर्वानी अंगीकृत करावे या विषयाला घेऊन लोकजागृती नाट्य, कला सांस्कृतिक संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष राष्ट्रीय प्रबोधनकार, सिनेकलावंत अनिरुद्ध वनकर यांच्या मार्गदर्शनात जनजागृती सुरू आहे. यात पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुल,फुटाना,नवेगाव मोरे,कवटी, बामणी तसेच या गावांमध्ये कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली असून तालुक्यातील बऱ्याच गावात जनजागृतीचे कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे मत ग्रुप प्रमुख लोकेश दुर्गे यांनी सांगितले.
या संचात लोकेश दुर्गे,जितू झाडे,राणा कोवे,अनिल डोंगरे,राजकपूर भडके,शोषित खोब्रागडे,स्वाती निकोडे,ऋतू गुरुनुले यांचे सह इतर कलावंताची उपस्थिती होती.