जाहिरात... Advertisement... विज्ञापन

थोर संतांच्या विचारानेच महाराष्ट्र समृद्ध:- विवेक बोढे #chandrapur

घुग्घुस येथील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात संत रविदास महाराज जयंती साजरी
चंद्रपूर:- बुधवार 16 फेब्रुवारीला येथील आ. सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.
मनोगत व्यक्त करतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले की महाराष्ट्रची भूमी साधू संतांच्या वास्तव्याने पावन झालेली आहे. आपण साधू संतांच्या विचारांवर चालून महाराष्ट्र समृद्ध करू शकतो. महाराष्ट्र घडविण्यात साधू संतांची शिकवण मोठी आहे. त्यांच्या आदर्श विचाराने समाज योग्य रीतीने घडू शकतो. संत रविदासजी महाराज यांनी सांगितलेल्या आदर्श विचाराने समोर जाऊया. मी संत रविदासजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो.
यावेळी रेड्डी राजाजी, सिनू कोत्तूर, भास्कर वाल्दे, सुनंदा लिहीतकर, लता आवारी, शीतल कामतवार, पायल मांदाळे, स्वाती गंगाधरे, भरती परते, कुमकुम वर्मा, खुशबू मेश्राम, दुर्गा साहू, स्नेहा कुम्मरवार, लक्ष्मी येरलावार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत