Top News

चार किलोमीटरवर गाव असताना नियतीचा क्रुर खेळ #accident

वाशीम:- गावातील लग्न असल्यामुळे गवई कुटुंब व अन्य असे काही नागरिक मॅक्सिमो वाहनाने निघाले. लग्नही आटोपले. रात्रीच्या सुमारास ते सर्व कारने गावाकडे परत येण्यासाठी निघाले. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. वाटेत त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा व अन्य एकाचा असा पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर सावंगा जहांगीर गावावर शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, वऱ्हाडी घेऊन निघालेले वाहन वाशीम जिल्ह्यातील सावंगा जहांगीर येथून शेलूबाजार येथे गेले. लग्न आटोपून ते सर्व रात्री सावंगा जहांगीर या आपल्या गावी परत येण्यासाठी निघाले. शेलूबाजार-वाशीम मार्गावर असलेल्या सोयता फाट्यानजिक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. मॅक्सिमो या प्रवाशी वाहनाने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. ही घटना सोयता नजीक घडली. ही धडक इतकी भीषण होती की, मॅक्सिमो वाहनाचा चुराडा झाला.
या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार (died) झाले. भारत शंकर गवई, पूनम भारत गवई, सम्राट भारत गवई आणि रितिका भारत गवई असे ठार झालेल्यांची नावे आहेत. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातातील आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अकोला इथे पाठविण्यात आले आहेत.
अवघ्या चार किलोमीटवर होते गाव

भीषण अपघातातील (Road Accident) जखमींना वनोजा येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्ती व्यवस्थापन पथकाने बाहेर काढून रुग्ण वाहिकेद्वारे वाशीमच्या रुग्णवाहिकेमध्ये पाठवले. अपघात घडलेले ठिकाण सोयता आणि मृत कुटुंबाचे गाव सावंगा जहांगीर या दोन गावांचे अंतर अगदी चार किलोमीटर आहे. मात्र, नियतीने घर येण्याअगोदरच घाला घातल्याने पाचही जणांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांची घटनास्थळी गर्दी झाली होती. त्यानंतर तात्काळ मदतकार्य सुरू झाले. पोलिसही घटनास्थळावर दाखल झाले. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने