पोंभूर्णा नगरपंचायत स्विकृत सदस्य व विषय समिती सभापतींची निवड #pombhurna


शिवसेनेचे स्वीकृत सदस्य गणेश वासलवार, भाजपचे मनोज रणदिवे यांची निवड
पोंभूर्णा :- नगरपंचायत पोंभूर्णा विषय समिती सभापती निवड तसेच स्वीकृत नगरसेवक निवड २३ फेब्रुवारी ला करण्यात आली.

शिवसेना गटनेते व विरोधीपक्षनेते आशिष कावटवार


शिवसेनेचे स्विकृत सदस्य गणेश वासलवार


भाजपचे स्विकृत सदस्य महेश रणदिवे


यावेळी पोंभूर्णा नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्ष सुलभा पिपरे, उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार, शिवसेना, वंचित बहूजन आघाडी, काँग्रेस चे सर्व नगरसेवक याच्या बैठकीत विषय समिती सभापती यांची निवड करण्यात आली.
यामध्ये सार्वजनिक बांधकाम आणि वित्त नियोजन सभापती उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार, आरोग्य स्वच्छता व पाणीपुरवठा सभापती नंदा कोटरंगे, महिला व बालकल्याण सभापती आकाशी गेडाम, महिला व बाल कल्याण उपसभापती उषा गोरंतवार, शिक्षण क्रिडा व सांस्कृतिक सभापती रोहिणी ढोले यांची निवड करण्यात आली.
नामनिर्देशन सदस्य (स्विकृत) पदी शिवसेनेच्या वतीने गणेश वासलवार यांची तर भाजपाकडून मनोज रणदिवे यांची निवड करण्यात आली. तसेच शिवसेना गटनेते व विरोधीपक्षनेते पदी आशिष कावटवार यांची निवड करण्यात आली.
पिठासिन अधिकारी तथा बल्लारपूर उपविभागीय अधिकारी दिप्ती सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या उपस्थितीत समित्या गठीत करण्यात आले.


भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सर्व नवनियुक्त सभापतीचे अभिनंदन....

यावेळी संपूर्ण निवडणूक लोकलेखा समितीचे अध्यक्ष मा सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शन तसेच जिल्हा अध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे यांचे सुचणे नुसार विजय झाला. सर्व नवनियुक्त सभापतीचे रामजी लाखीया संघटक,अल्का आत्राम जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी, आशिष देवतळे युवा मोर्चा अध्यक्ष, ईश्वर नैताम महामंत्री, ऋषीं कोटरंगे अध्यक्ष, नंदकिशोर तुंमलवार जेष्ठ,सुलभा पीपरे नागराध्यक्ष, अजित मंगळगिरिवार उपाध्यक्ष, श्वेता वनकर,दर्शन गोरंटीवार, संजय कोडापे,शारदा गुरनुले नगरसेवक,गजानन मुडपूवार, गुरूदास पीपरे, नरेंद्र बघेल, बंडू बुरांडे, वैभव पिंपळशेडे, अजित जबूलवार, आणि सर्व कार्यकर्ते उपस्थिती होते.


पोंभूर्णा नगरपंचायतवर शिवसेना गटनेता व विरोधी पक्षनेता पदी आशिष कावटवार यांनी निवड तर स्वीकृत नगरसेवक पदी शिवसेना शहर प्रमुख गणेश वासलवार यांनी निवड झाल्याबद्दल नगरसेवक, 
 शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत