Top News

तरुणाईला लागले 'व्हॅलेंटाईन डे' चे वेध! #Velentineday

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर प्रेम बहार आठवड्याला सुरुवात होते. प्रेमी युगुल याची आतुरतेने वाट पाहत असतात.
फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर प्रेमी युगुल 'व्हेलेंटाईन डे'सह 'व्हेलेंटाईन वीक'ची सुद्धा आतुरतेने वाट पाहतात. दि. 7 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत 'व्हेलेंटाईन वीक' साजरा केला जातो. 'रोझ डे'पासून व्हेलेंटाईन वीकची सुरुवात होते. गुलाबाचे फूल प्रेमाचे प्रतीक मानले जाते. यामुळेच व्हेलेंटाईन वीकची या दिवसापासून सुरुवात होते, असे म्हटले जाते.
या दिवशी प्रेमी जोडपी एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. हा दिवस साजरा करण्यामागे असेही सांगितले जाते की, महाराणी व्हिक्टोरियाच्या काळात आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी लोकांनी एकमेकांना लाल गुलाब देण्याची परंपरा सुरू केली. त्यामुळे गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जाऊ लागले. प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि व्हॅलेंटाईन डे अशा पद्धतीने हा आठवडा साजरा केला जाणार आहे.
व्हॅलेंटाईन डे ला आपल्या मित्र-मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी शहरातील सर्व दुकानांत सध्या तरुणांची गर्दी पहावयास मिळत आहे. गुलाबाच्या फुलापासून ते महागडे गिफ्ट देण्याची या दिवसांत पद्धतच पडली आहे. तरुणाईची नेहमी बगीचांमध्ये वर्दळ असतेच. परंतु या आठवड्यात मात्र तरुणाची वर्दळ जरा जास्त पहावयास मिळते. पर्यटन स्थळे, बगीच्या, गार्डन इत्यादी ठिकाणी व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी येत असल्याचे दिसून येत असते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने