Top News

सुब्बई येथील प्रकल्प पीडितांचा वेकोली कार्यालयासमोर धरणे आंदोलन#wcl

१३ फेब्रू.पर्यंत न्याय न मिळाल्यास बेमुदत कोल डिस्प्याच बंद; WCL ला शेवटचा अल्टिमेटम


राजुरा:- बल्लारपूर वेकोलि हद्दीतील सुबई चिंचोली प्रकल्प 12 वर्षांपासून प्रलंबित आहे. यामध्ये जमिनीचे भूसंपादन झालेल्या 205 शेतकऱ्यांची नौकरी अद्याप प्रलंबित असून या प्रकल्पात सुमारे 40 करोड रुपये मोबदला मिळालेला नाही. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी निवेदन व आंदोलनही केले आहे. मात्र मागण्या मान्य न झाल्यामुळे आता धोपटाला येथील डब्ल्यूसीएल प्रबंधक कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे सल्लागार प्रविन मेकर्तीवार यांनी 11 फेब्रुवारी 2022 ते 13 फेब्रुवारी 2022 पर्यंत धरणे आंदोलन करणार जर न्याय न मिळाल्यास बल्लारपुर परिसरातील कोल डिस्पाच न्याय मिळेपर्यंत शेतकरी बंद ठेवणार असे सांगितले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सूब्बई-चिंचोली प्रकल्पातील  २०५ प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. 
प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांची दिशाभूल करून मत्रालयात डिनोटिफिकेशन साठी पाठविलेला प्रस्ताव त्वरीत माघे घेऊन डिनोटीफाईड करणार नसल्याचे लेखी पत्र मंत्रालय आणि प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावे.
चिंचोली रिकास्ट प्रकल्पातील 205 प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर नोकऱ्या देण्यासह संपादित शेतजमिनीचा मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे.
 चिंचोली प्रकल्पांतर्गत सेक्शन 11 लावून जमिनी संपादित झाल्या तरी नोकरी व रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे.
या प्रकल्पासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून wcl मात्र स्वार्थ हेतुपूर्वक नौकरी आणि आर्थिक मोबदला देण्यासाठी वेळ काळू धोरण अवलंबिले आहे....
एक महिन्या अगोदर नागपूर येथे संविधान चौकात आंदोलन करण्यात आले मात्र काही राजकीय नेत्याने आपले सर्व मागण्या पूर्ण झाले असे सांगून वेकोली सी साठेलोठे करून ते आंदोलन मोडीत काढून शेतकऱ्यांची फसवणूक केली,
आता मात्र शेतकरी स्वतः कोणाच्याही नेतृत्वात न येता स्वबळावर लढणार असल्याचे अविनाश जाधव, प्रविन मेकर्तीवार, शरद चपले, अरुण सोमलकर यांनी सांगितले आहे..
आता बळीराजाने मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन पुकारले.#wcl

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने