नगराध्यक्ष पदी सुलभा गुरूदास पिपरे, उपनगराध्यक्ष पदी अजित मंगळगिरीवार यांची निवड
नगराध्यक्ष सुलभा गुरूदास पिपरे
उपनगराध्यक्ष अजित मगळगिरीवार
नगराध्यक्ष
भाजपा १०
शिवसेना ७
उपनगराध्यक्ष
भाजपा १०
वंचित ७
पोंभूर्णा व्हाईट हाऊसवर कमळ फुलला
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आपला गड राखला
पोंभूर्णा नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या सुलभा गुरूदास पिपरे विराजमान झाल्या आहेत.
झालेल्या मतदानात भाजपाच्या सुलभा गुरूदास पिपरे यांना १० मते मिळाली तर शिवसेनेच्या रामेश्वरी गणेश वासलवार यांना ७ मते मिळाली.
पोंभूर्णा नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाचे अजित अरूण मंगळगिरीवार यांची निवड करण्यात आली आहे.
झालेल्या मतदानात भाजपाच्या अजित अरूण मंगळगिरीवार यांना १० मते मिळाली तर वंचितच्या रिना पवन ऊराडे यांना ७ मते मिळाली.