Top News

दिनकरराव अल्याडवार आणि त्यांचे कुटुंबीकडून 120 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, बुक, पेन, खाऊ व चाकलेटचे वाटप



गोंडपिपरी:- दिनांक 25 मार्च 2022 रोजी. उच्च प्राथमिक शाळा वडकुली या शाळेमध्ये उपस्थित असलेल्या 120 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, बुक, पेन, खाऊ व चाकलेटचे वाटप दिनकरराव अल्याडवार आणि त्यांचे कुटुंबीय यांनी केले.

दिनकर अल्याडवार हे वडकुली येथे 1971 ते 2006 पर्यंत वास्तव्याला होते. त्या कालावधीमध्ये त्यांची गावासोबत एक नाळ जोडलेली होती‌. आपण या गावात वास्तव्याला होतो आणि आपलं काही सामाजीक देणं लागतो या उद्देशातून त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, सोबतच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची कामना केली.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर अल्याडवार सर यांनी केले. अतुल अल्याडवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना जुन्या गावातील आठवणी ला उजाळा दिला बालपणापासून 35 वर्ष गावात वास्तव्याला असताना झालेल्या सुखदुःखाच्या गोष्टींना उजाळा देण्यात आला. तसेच रजनी अल्याडवार यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या कामना देत संबोधन केलं.
सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेतील मुख्याध्यापक एकोणकर यांनी केले कार्यक्रमाला अश्विनी अल्याडवार, कल्याणी अल्याडवार, गंगाराम सूरकर, बाजीराव कुमरे, श्री साबळे सर, श्री. आञाम सर उपस्थित होते विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचा खूप आनंद झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने