नगर पंचायत तसेच जनप्रतिनधीचे पूर्णतः दुर्लक्ष्य #sindewahi

Bhairav Diwase

सिंदेवाही तालुक्यातील श्रेणी क्र. 01 चा पशूवैद्यकीय दवाखाना जीर्ण अवस्थेत
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- तालुक्यातील पशुवैधकीय दवाखाना श्रेणी क्र.१ मध्ये येत असलेल्या दवाखान्याकडे सर्वांचे लक्ष्य लागलेले आहॆ. दवाखान्याच्या चार हि बाजूनी कचराचा ढिगार,कवेलूची फुटली तुटली जुनी इमारत, बाहेरील रस्त्यावरील लोक तिथेच लघुशन्का करायला गेट मधून प्रस्तान करतात आणि दवाखान्याचा खुल्या आवारात गंदगी करून जातात.
वास्तविकता अशीं कि ह्या दवाखान्यात श्रेणी क्र.१ पदाचे अधिकारी आहॆत. या दवाखान्यात ते नोकरी करतात.मात्र इथे वाटत नाही कि हे प्रथम दर्जाचे पशू वैद्यकीय अधिकारी असलेला दवाखाना आहे. या दवाखान्याची वास्तविक परिस्थिती बघता पडक्या वाड्यासारखं आहे. अनेक तालुक्यातील लोक आपल्या प्राण्यांना तालूकाच्या ठिकाणी सर्व सुविधा असतात या आशेने आणतात मात्र इथे आल्यानंतर काही वेगळीच रूपरेषा पाहायला मिळतो.साधी प्राणी बांधायला व्यवस्था नाही, तसेच जनावराच्या मालकांना आपल्या जनावराचे उपचार करायला आणले असता कुठं उभे राहावे किंवा कुठं थोडासा विसावा घ्यावा यासाठी विचार करावा लागतो. परिसरा मध्ये पूर्णता घनकचरा पसरलेला आहॆ.
मात्र याकडे पूर्णतः नगरपंचायत तसेच लोकप्रिनिधींनीचे दुर्लक्ष्य आढळून होताना दिसत आहॆ. याचं दवाखान्यात आत्ता पाळीव कुत्रे रोज आणल्या जात आहॆ. मात्र त्यांना सलाईन लावून दिल्यानंतर तिथे मातीत बसून लोकांना आपले जीव मुठीत धरून बसावे लागत आहॆ. कारण कवेलूची इमारत असल्यामुळे व माकडाचा हैदोस असल्यामुळे दुर्घटना टाळता येत नाही. त्यामुळे इथे जे जे जनावर मालक आपल्या जनावराचा उपचार करायला आणतात ते सर्व आपला जीव मुठीत धरून येतात असे म्हणाला काही हरकत नाही. तसेच पशुवैधकीय अधिकारी व तेथील कर्मचारी सुद्धा आपला जीव मुठीत धरून काम करीत असताना दिसत आहॆ.
त्यामुळे या पशुवैधकीय पहिल्या श्रेणीमध्ये असलेल्या दवाखान्याकडे येथील स्थानिक नगपंचायत तसेच लोक्रतिनिधींनीनी याकडे आवर्जून लक्ष्य द्यावे अशीं मागणी समस्त सिंदेवाही तालुक्यातील नागरीकांकडून होत आहॆ.