Click Here...👇👇👇

निराधार व श्रवनबाळ योजनेचे पैसे लाभार्थ्यांना त्वरित वितरीत करा; तहसीलदारांना निवेदन.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- दि.09 मार्च रोज बुधवार ला राजुरा  शहर व तालुक्यातील अनेक लाभार्थीना निराधार व श्रावनबाळ योजनेचे पैसे दोन ते तीन महिने लोटूनही अजून मिळाले नाही.


त्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यावर अजूनही काही उपाय योजना करण्यात आली नाही असे भाजयुमो तालुका कार्यालयात अनेक नागरिकांनी सुचविले यावर वेळ न गमावता भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे यांनी राजुराचे तहसीलदार श्री.हरीश जी गाडे  यांना योजनांचे पैसे त्वरित वितरित करा असे निवेदन दिले व चर्चेदरम्यान तहसीलदार साहेबांनी सुद्धा सकारात्मक माहिती देत लवकरात लवकर लाभार्थ्यांना पैसे वितरित केल्या जाईल असे सांगितले.
याप्रसंगी भाजयुमो तालुका महामंत्री रवी बुरटकर, भाजयुमो सास्ती अध्यक्ष अरुण लोहबडे, युवानेते, मारोती चन्ने, रोशन लोहबडे  संदीप मडावी, यांची उपस्थिती होती.