Top News

आक्सापूर - चिंतलधाबा मार्गासाठी ऑटो चालक मालक संघटनेचा रास्तारोको आंदोलन


ऑटो चालक-मालक संघटना आक्रमक; गावकऱ्यांची मिळाली साथ 

तीन तास वाहतूक ठप्प; स्कुल बस व ॲम्ब्युलन्सला मुभा
पोंभूर्णा:- गोंडपिपरी व पोंभुर्णा या दोन तालुक्याला जोडणारा आक्सापूर  चिंतलधाबा रस्ता पुर्णपणे उखळला आहे. प्रवासी व वाहतूकदारांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता. ऑटो व इतर वाहनांची समस्या वाढू लागली. अनेकदा संघटनेच्या वतीने संबंधित विभाग व प्रशासनाकडे समस्यांचे निवेदन देण्यात आले.मात्र यावर दखल घेण्यात आली नाही. यासाठी संघटनेच्या वतीने व चिंतलधाबा ग्रामस्थांनी ३० मार्चला रास्तारोको आंदोलन करून प्रशासनाला वेठीस धरले. आंदोलन चिघळत असल्याचे लक्षात येताच तहसिल प्रशासन, पोलिस प्रशासन व बांधकाम विभागाचे अधिकारी चिंतलधाबा येथे हजर झाले. वरिष्ठांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्यासाठी संघटनेला काही वेळाची मुद्दत मागण्यात आली. तीन तास रास्तारोको आंदोलन करून वाहतूक ठप्प पडण्यात आली होती. 
बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे व कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे आक्सापूर चिंतलधाबा रोडचे काम मागील चार वर्षांपासून रखडले आहे. कंत्राटदाराच्या वेळकाढूपणामुळे  रस्त्याची फार मोठी दुरावस्था झाली आहे. ऑटो,टु व्हीलर,चार चाकी वाहने चालविणे कठीण झाले आहे. सामान्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जीव मुठीत घेऊन या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. या मार्गाने प्रवास करताना जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. प्रवासी , दुचाकीस्वार यांच्यासह वाहतूकदारांपुढे मोठी समस्या निर्माण झाली असून , याची दखल परिसरातील अटो चालक - मालक संघटनेनी घेतली. अनेकदा संघटनेच्या वतीने  रस्त्याच्या  विषयाला घेऊन प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आले मात्र संबंधित विभाग व प्रशासनाने दखल घेतली नाही. प्रवासी व वाहतूकदारांच्या समस्यांना घेऊन ॲटो संघटनेने रास्ता रोको आंदोलनाचा शस्त्र उगारला. डोळे मिटून गप्प असलेल्या बांधकाम विभागाला यामुळे जाग आली. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उप अभियंता एन.डी.वैद्य हे आंदोलन स्थळी भेट देऊन रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याचे लेखी  आश्वासन दिले. यावेळी नायाब तहसिलदार तिरणकर, ठाणेदार धर्मेद्र जोशी उपस्थित होते.
 पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा ते आक्सापूरपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत मंजूर असलेल्या रोडचे काम मागील चार वर्षापासून सुरू आहे . सध्यस्थितीत सुरू असलेल्या या रोडच्या कामाचे स्वरूप बघता कामाला कासवगती प्राप्त झाली आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाला लकवा मारला की काय , अशा संथगतीमुळे रस्ता आहे त्याच परिस्थितीत आहे . त्यामुळे छोटे - मोठे अपघातांची मालिका सुरूच आहे . दरम्यान ऑटोचालकांनासुद्धा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे . त्यामुळे या रस्त्याचे काम वेगाने व्हावे यासाठी म्हणून ॲटो चालक - मालक संघटनेनी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 
यावेळी संघटनेचे अध्यक्ष संभाजी वासेकर , दीपक कवटलावार , संदीप कोडापे , रंजीत जुवारे , नितेश येरोजवार , घनश्याम आगरकर , राजेंद्र तालेवार , विनोद धोडरे , संजय ऊराडे, रफीक शेख आदी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने