आज भाजपा महानगर करणार 'त्या'नोटिशीची होळी #chandrapur
personBhairav Diwase
रविवार, मार्च १३, २०२२1 minute read
share
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याच्या ऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बजावली याचा तीव्र निषेध करीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्या नोटीशीची होळी करण्याचा आदेश पक्ष कार्यकर्त्यांना दिला आहे. त्या अनुषंगाने रविवारी सकाळी 10 वाजता गांधी चौक येथे त्या नोटिशीची होळी करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविला जाणार आहे.
यावेळी लोकलेखा समितीचे अध्यक्ष, माजी अर्थमंत्री आ सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती राहणार असून भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे असे आवाहन महानगर भाजपाने केले आहे.