Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

भाजपा महिला मोर्चा तर्फे जागर आदिशक्‍तीचा कार्यक्रम उत्‍साहात साजरा #chandrapur

महिलांनी आत्‍मविश्‍वास वाढवुन आत्‍मसन्‍मान राखत समाजसेवा आणि राजकारण केले पाहिजे:- सौ. अंजली घोटेकर

महिलांनी आज सर्व क्षेत्रात आपली चुणूक दाखविली आहे:- डॉ. मंगेश गुलवाडे
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार, अध्‍यक्ष, विधीमंडळ लोकलेखा समिती तथा माजी वने व अर्थ आणि नियोजन मंत्री तथा माजी पालकमंत्री यांच्‍या मार्गदर्शनात दि. १० मार्च २०२२ ला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे ८ मार्च जागतिक महिला दिना निमित्‍त महेश भवन तुकूम येथे ‘’जागर आदि शक्‍तीचा’’ हा कार्यक्रम भाजप महिला मोर्चा जिल्‍हाध्‍यक्ष सौ. अंजली घोटेकर यांच्‍या नेतृत्‍वात घेण्‍यात आला.
या कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थान मा.श्री. डॉ. मंगेशजी गुलवाडे यांनी भुषविले तर प्रमुख मार्गदर्शक म्‍हणून धर्मदाय आयुक्‍त कार्यालयचे अधिक्षक श्री. प्रशांत भुरे सर, सायबर गुन्‍हा सेलचे श्री. मुजावर अली, श्री. संतोष पानघाटे यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी मंचावर भाजप नेते रामपाल सिंग, मंडल अध्‍यक्ष विठ्ठलराव डुकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेकरीता सौ. शिला चव्‍हाण महामंत्री तथा नगरसेविका यांनी विशेष परिश्रम घेतले.
🌆
यावेळी डॉ. मंगेश गुलवाडे, मुजावर अली, संतोष पानघाटे, प्रशांत भुरे, रामपाल सिंग, विठ्ठल डुकरेसह सर्व भाजप महिला मोर्चाच्‍या पदाधिकारी आणि सर्व नगरसे‍विका यांनी भारत माता, मा जिजाऊ, छ. शिवाजी महाराज, क्रांती ज्‍योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिभेला पुष्‍पहार घालुन व अभिवादन करुन कार्यक्रमाची रितसर सुरुवात केली. यानंतर सौ. कल्‍पना बगुलकर नगरसेविका यांनी स्‍वागत गीत गाऊन पाहूण्‍यांचे स्‍वागत केले. पाहुण्‍यांचा पुष्‍पगुच्‍छ देवुन स्‍वागत झाल्‍यानंतर सुनंदा राठोड, मालती लांडे, छाया चामाटे, कु. रुची लांडे यांनी गोंधळ नृत्‍य सादर केले.
🌆
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक करताना सौ. अंजली घोटेकर म्‍हणाल्‍या की, आज क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले यांची पुण्‍यतिथी आहे. आज महिला कोणत्‍याच क्षेत्रात मागे नाही. महिला प्रत्‍येक क्षेत्रात पुरुष्‍यांच्‍या खाद्यांला खांदा लावुन काम करीत आहे. घर आणि ऑफीस या दोन्‍हीची जवाबदारी तसेच सासर आणि माहेर या दोन्‍हीची जिम्‍मेदारी ती लिलया पेलत आहे. म्‍हणून प्रत्‍येक स्‍त्री ने आत्‍मविश्‍वास वाढवुन आत्‍मसन्‍मानासाठी काम केले पाहिजे. चांगल्‍या मार्गाने जावून समाज सेवा केली पाहिजे. कोण काय म्‍हणेल याकडे लक्ष न देता परिवार आणि समाजाचे हीत लक्षात घेवुन काम केले पाहिजे.
🌆 यानंतर सायबर गुन्‍हे विषयी मार्गदर्शन करताना श्री. मुजावर अली व श्री. संतोष पानघाटे पोलिस विभाग यांनी सविस्‍तर माहीती देताना सांगीतले की, आपल्‍या हाती जरी स्‍मार्ट फोन आला असेल तरी आपण स्‍मार्टपणेच या मोबाईलला हाताळले पाहीजे. मोबाईलच्‍या रुपात संपूर्ण जग आपल्‍या मुठीत आले आहे. पण कळत न कळत कधी-कधी आपण फेसबुक किंवा व्‍हॉट्सअपच्‍या माध्‍यमातुन विनाकारणच्‍या मोहाला बळी पडून गुन्‍हे करीत असतो. आपली फसवणुक करुन घेत असतो. अशा वेळेस आपण सावधतेने मोबाईल हाताळला पाहिजे. आपली मुले मोबाईल घेवुन एकांतात तर याचा वापर करीत नाही ना याच्‍याकडे प्रत्‍येक आई-वडीलांनी दक्ष होवुन लक्ष दिले पाहिजे आणि आपल्‍या सोबत काही गुन्‍हे घडले किंवा आपली काही फसवणुक झाली तर पोलिस विभागाच्‍या सायबर क्राईम सेल सोबत त्‍वरित संपर्क साधून तक्रार नोंदवली पाहिजे. हाताळलेल्‍या अनेक केसेसचा त्‍यांनी दाखला देवून मोबाईल द्वारे कसे गुन्‍हे घडतात याच्‍याबद्दल विस्‍तृत मार्गदर्शन केले. 🌆
या कार्यक्रमात भजन मंडळांचा सत्‍कार करुन त्‍यांना मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे प्रमाणपत्र वितरण करण्‍यात आले. धर्मदाय आयुक्‍त कार्यालयाचे श्री. प्रशांत भुरे यांनी महिलांना संस्‍था नोंदणी करताना कशा नोंदणी केल्‍या पाहिजे संस्‍थेचे नाव देताना कार्यालयाशी संपर्क करुन काय करावे, एनजीओ आणि सामाजिक संस्‍था यांच्‍यातील नोंदणीचा फरक त्‍यांनी सांगीतला. तसेच ऑडीट कसे करावे याच्‍याबद्दलही मार्गदर्शन केले. महिलांनी विचारलेल्‍या अनेक प्रश्‍नांचे त्‍यांनी समर्पक उत्‍तरे दिली. त्‍यानंतर छोटया मुलींनी आदिवासी नृत्‍य सादर केले. त्‍यानंतर विशेष क्षेत्रात काम करणा-या घंटागाडीताई नंदेश्‍वरी किल्‍लन यांचा सत्‍कार करण्‍यात आला. त्‍यांनी घंटागाडी चालवुन आपल्‍या मुलाला शिक्षित करुन सैन्‍यमध्‍ये भरती होण्‍याकरीता त्‍याला प्रेरित केले. म्‍हणून या वीर मातेचा सत्‍कार करण्‍यात आला. इंदिरा नगर येथील कु. नव्‍या वय वर्ष ५ हीने स्‍त्री शक्‍तीवर उत्‍तम अशी कविता सादर केली. तत्‍पश्‍चात कोरोना कार्यकाळात उत्‍तम काम केल्‍याबद्दल भाजप महिला मोर्चाच्‍या सचिव सौ. कविता जाधव यांचा सत्‍कार करण्‍यात आला.
🌆
कविता जाधव आणि त्‍यांचे पती त्‍यानंतर अध्‍यक्षीय भाषण करीताना डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सर्वांना महिला दिनाच्‍या शुभेच्‍छा देत सांगीतले की, स्‍त्री ही आदिशक्‍ती आहे. आज सर्व क्षेत्रामध्‍ये स्‍त्रीयांचा सहजतेने वावर होत आहे. बैलगाडी चालविण्‍यापासून ते अंतराळात स्‍पेसशिप चालविण्‍यापर्यंत महिलांनी मजल मारलेली आहे. आज राजकारणात देखील स्‍त्रीया सक्रियतेने भाग घेत आहे. या कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेकरीता सौ. माया उईके, सौ. रेणुकाताई घोडेस्‍वार, सौ. लिलावती रवीदास, कविता जाधव सिंधु राजगुरे, रंजिता येले, मोनिषा महातव या पदाधिका-यांनी परिश्रम घेतले. 🌆
यावेळेस मंचावर मा. नगरसेविका व गटनेत्‍या सौ. जयश्री जुमडे, म.व.बा. सभापती सौ. पुष्‍पा उराडे, म.व बा. उपसभापती शितल कुळमेथे, झोन क्र. २ च्‍या सभापती खुशबु चौधरी, सौ. अनुराधा हजारे, सौ. शितल गुरनुले, सौ. कल्‍पना बगुलकर, सौ. संगिता खांडेकर, सौ. वनिता डूकरे, सौ. वंदना जांभुळकर, सौ. आशा आबोजवार यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उत्‍कृष्‍ठ संचालन नगरसेविका सौ. सविता कांबळे यांनी केले. तर सौ. माया उईके यांनी सर्वांचे आभार मानले. 🌆
या कार्यक्रमाकरीता भाजप महिला मोर्चाच्‍या सौ. प्रज्ञा गंधेवार महामंत्री, सौ. प्रभा गुडधे, सौ. मंजुश्री कासनगोट्टूवार, सौ. किरण बुटले, सौ. वंदना संतोषवार, सौ. स्मिता रेभनकर, चंद्रकला सोयाम, सौ. विशाखा राजुरकर, सौ. माया बुरडकर तसेच सर्व भजन मंडळाच्‍या प्रमुख आणि बचत गटांच्‍या प्रमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत