ट्रकची मागून धडक बसल्याने एका युवकाचा मृत्यू #death #accident

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
बल्लारपूर:- सकाळी आठ वाजता चा दरम्यान काटा गेट समोरील मोडीवर एका ट्रक ने स्कुटीस्वार मृतक कुणाल गजानन डबरे (36) याला मागून जोरदार धडक बसल्याने ट्रक चा मागचा चाक मृतक चा डोक्यावरून चाक गेल्याने जाग्यावरच मृत्यू झाला.
विसापूर रेल्वे गेट जवळ राहणाऱ्या गजानन डबरे व मुलगा कुणाल डबरे दोघेही रेल्वे स्टेशन ला आपल्या मुलाला पोहचविण्यासाठी घरून निघाले बल्लारपूर येथील काटा गेट समोरील मोडीवर वाघमारे किराणा समोर सचिन जैन लिहलेल्या ट्रक क्र, mh-34-AV-0994 या ट्रक ने स्कुटी ला मागून धडक बसल्याने बाप-बेटे रोडच्या दोन्ही बाजूंनी पडले. त्यात मुलगा कुणाल चा डोक्यावरून ट्रक चा मागचा चाक गेल्याने भेजा बाहेर निघाल्याने जाग्यावरच मृत्यू झाला. बापा समोरच मुलाचा मृत्यू झाल्याने बापावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले व मृतक ला शवविच्छेदन करिता ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले.पोलिसांनी ट्रक व ट्रक ड्राइवर ला ताब्यात घेतले आहे‌. पुढील तपास पोलीस करीत आहेत.