Top News

जागतिक वन दिन निमित्य विरुर व राजुरा वनक्षेत्रात विविध कार्यक्रम #Rajura

राजुरा:- जागतिक वन दिन निमित्य मध्य चांदा वन विभागाच्या विरुर व राजुरा वनपरिक्षेत्रात वने व वन्यजीव बाबत जनजागृती रॅली काढण्यात आली नंतर विद्यार्थ्याना वन भ्रमण करून वनसपदेची सविस्तर माहिती देण्यात आली विद्यार्थी मोठ्या उत्साहाने वनसफारीचा आंनद लुटला आणि वनविभागाची माहिती जाणून घेतली.
विरुर वनपरिक्षेत्र अंतर्गत कोष्टला जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्याना क्षेत्र सहायक मनोहर गोरे यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी,वनरक्षक एन आर लाडसे,रवींद्र वैद्य, संयुक्त वनव्यवस्थापन समिती सदस्य,वनमजुर,शिक्षक ,विद्यार्थी उपस्थित होते.
तर राजुरा वनपरिक्षेत्रात उपविभागीय वनाधिकारी अमोल गर्कल,वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांचे नेतृत्वात स्थानिक शिवाजी विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, क्षेत्र सहायक, वनरक्षक, वनकर्मचारी, वनसमितीचे सदस्य यांनी शहरातून वने व वन्यजीव जनजागृती रॅली काढून नंतर प्रसिद्ध जोगापूर येथील जंगलात वनभ्रमंती करून नंतर विद्यार्थ्याना पर्यावरण संरक्षणात वने व वन्यजीव याचे अन्नसाखळी बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले,विद्यार्थी मोठ्या उत्साहाने वने व वन्यजीव बाबत माहिती जाणून घेण्यात हिरीरीने भाग घेतला होता,त्यानंतर अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने