गोंडपिपरी तालुक्यातील भनारहेटी शेत शिवारात सागवान तस्करी #gondpipari

Bhairav Diwase

सागतस्करीचे चेक आष्टा कनेक्शन; तीन आरोपी वनविभागाच्या ताब्यात
गोंडपिपरी:- मध्यचांदा वनविभागांतर्गत धाबा परिक्षेत्रातील खराळपेठ जंगलातून मोठ्या प्रमाणात सागवनाची तस्करी होत असल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. दरम्यान, पोंभुर्णा तालुक्यातील सोनापुर गावातील एका मेटॅडोर वाहनात हा सागाचा माल तणसीमध्ये झाकून त्याची तस्करी होताना वनपथकाने मोक्यावर धाड टाकली. याप्रकरणी वाहनचालक व मालकासह दोन आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले असून मालदेखील जप्त करण्यात आहे. मेटाडोर भरून मोठ्या प्रमाणात सागाची धाबा वनपरिक्षेत्रातील जंगलातून दिवसा ढवळ्या तस्करी होत असतांना येथील वनविभागाच्या कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
गोंडपिपरी व पोंभुर्णा तालूक्यात रोटीबेरोटी चे व्यवहार चालतात यांतच पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा गावात राहणाऱ्या साईनाथ बोडेकर आणि गोंडपिपरी तालुक्यातील चेक घडोली गावचे शरद काळे या दोघांनी मिळून मागील काही दिवसांपासून बेत रचून खराळपेट जंगल क्षेत्रातील सागवान वृक्ष तस्करी करण्याचा प्रकार चालविला.
चेक घडोली गावापासून तालुक्यातील भनारहेटी शेत शिवारात लागुन आहे शिवारातील साईनाथ पेंन्दोर यांच्या शेतात सागवण लाकूड भरलेला पिक अप उभा असल्याची माहिती स्थानिक वनकर्मचारी यांना मिळाली. पथकाने मोक्यावर धाड टाकली असता पिक अप वाहणात सुमारे 29 सागफाटे आढळून आले. पिक अप अतुल पिंपळशेंडे यांच्या मालकीची आहे. यावेळी चालक व मालक म्हणुन तो स्वतः हजर होता. वन पथकाने त्यांच्यासह शरद व साईनाथ या दोघांनाही चौकशी साठी ताब्यात घेतले. प्रत्यक्ष दश्सिने दिलेल्या माहितीनुसार यावेळी वरील तिनही आरोपी शिवाय त्यांच्यासोबत ईत्तर चार ते पाच आरोपी होते. मात्र ते पसार झाले.
घटनास्थळावरून पसार मेटॅडोर वाहन क्रमांक एमएच ३४ एव्ही १८६५ या गाडीसह तेथील साग वृक्षाचा माल वनविभागाने जप्त केला असून त्याचा साठा गोंडपिपरी येथील उपवनक्षेत्र कार्यालयात जमा केला आहे. सद्यस्थितीत सदर घटनेचा तपास क्षेत्र सहाय्यक ढुमणे, वनरक्षक उरकुडे करीत आहेत.