Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये सचिन शिंदे उत्कृष्ट स्वयंसेवक pombhurna


ग्रामपंचायत आष्टा कडून प्रमाणपत्र देऊन गौरव
पोंभुर्णा:- ग्रामपंचायत कार्यालय आष्टा कडून सचिन शिंदे उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. चिंतामणी कालेज आफ कामर्स पोंभूर्णा यांनी सन २०२१- २२ मध्ये आष्टा येथे झालेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये उत्कृष्ट कार्य केले.
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत चिंतामणी बहुद्देशिय शिक्षण मंडळ, बल्लारपूर व्दारा संचालित चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स, पोंभुर्णा, आझादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त ग्राम विकास व जलसंवर्धनाकरीता युवाशक्ती या संकल्पनेवर आधारीत राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत आष्टा येथे दि. १९ ते २५ मार्च पर्यंत करण्यात आले होते.
दिनांक 25 मार्चला समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या समारोपीय कार्यक्रमात सचिन शिंदे या स्वयंसेवकाचा गाववासीय तर्फे उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. करिता त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना ग्रामपंचायत आष्टा कडून प्रमाणात देण्यात आले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत