जाहिरात... Advertisement... विज्ञापन

पक्षाचं चिन्ह फ्लाॅवर, पण आम्ही आता फ्लाॅवर नाही तर फायर होणार:- आ. सुधीर मुनगंटीवार #Mumbai #Maharashtra #chandrapurमुंबई:- नवाब मलिकांचा राजीनामा राज्य सरकारने द्यावा, म्हणून आज भाजपा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. नवाब मलिकांना ईडीने ताब्यात घेऊन देखील राज्य सरकार राजीनामा घेत नसल्याने आज भाजपाकडून मोर्च्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
त्यावेळी तिथं नवाब मलिक यांच्यामागे सत्ता उभी केली, या सरकारपासून महाराष्ट्राला मुक्त करायचं आहे. बेईमान आघाडीला नेस्तनाबूत करायचं आहे. युतीच्या प्रेमापोटी नवाब मलिक यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दहशतवादामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे त्यांना जमिनीच्या माध्यमातून पैसे वाटले आहेत अशी भाजपाचे नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
ज्या देशाचा देशभक्त दहशतवादाला विसरतो तो कधीच सुरक्षित राहू शकत नाही. 1993 बॉम्बस्फोटात कोणी हात गमावला, कोणी पाय गमावला. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सत्ता प्रिय आहे. ही फक्त सत्तेसाठी विचार करणारी लोक आहेत. "आमच्या पक्षाचं चिन्ह फ्लॉवर आहे, पण आम्ही आता फ्लावर नाही तर फायर होणार" असं म्हणत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत