Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

गोंडपिपरी शहरात सुशोभीकरणासाठी एक कोटीचा निधी मंजुर #gondpipari

आ. धोटेंचे प्रयत्न; पक्षपात सोडून विकासावर भर
गोंडपिपरी:- येथील नुकतीच नगरपंचायत ची सार्वत्रिक निवडणूक आटोपली असून शिवसेनेच्या सहाय्याने काँग्रेसने सत्ता स्थापन केली. अशातच निवडणुकीपूर्वी प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांना दिलेले वचन पूर्ण करत क्षेत्र आ. सुभाष धोटे यांनी प्रभाग क्रमांक 13 मध्ये काँग्रेस उमेदवार निवडून आला नसला तरी मात्र खुल्या जागेच्या सुशोभीकरणासाठी एक कोटीचा निधी मंजूर करून आणला. यामुळे प्रभागातील सुशोभीकरनामुळे शहराला विकासाची चालना मिळाली आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात निर्णय तालुका म्हणून गोंडपिपरी तालुक्याची ओळख आहे. अशातच शेत्र आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी तालुक्याला सर्वांगीण विकासाकरिता विविध योजनेअंतर्गत विकासात्मक कामासाठी आजवर अथक प्रयत्नातून कोट्यवधींचा निधी प्राप्त करून दिला. अशातच जानेवारी महिन्यात गोंडपिंपरी येथील नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना प्रभाग क्रमांक तेरा राष्ट्रसंत तुकडोजी नगर येथे प्रचारादरम्यान प्रभागातील नागरिकांच्या मागणीनुसार खुल्या जागीची सुशोभीकरणाचे ची जबाबदारी पूर्ण करण्याचे वचन आमदार धोटे यांनी नागरिकांना दिले होते.
अशातच नगरपंचायत निवडणुकीचे निकाल समोर आले व प्रभाग क्रमांक 13 मधील काँग्रेस उमेदवार पराभूत झाले. मात्र या पराभवा संदर्भात कुठलीही तमा व पक्षपात न करता शेत्र आमदार सुभाष धोटे यांनी शासनाच्या नागरी सुविधा सहाय्य योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांना दिलेले वचन पूर्ण करीत प्रभागातील खुल्या जागेच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी खेचून आणला असून लवकरच या निधीतून प्रभाग क्रमांक 13 मधील खुल्या जागेचा कायापालट होणार असून सुशोभीकरण करण्यात येणार असल्याने शहराच्या विकास कामात आणखी मोठी भर पडणार असल्याची माहिती नगरसेवक राकेश पुण यांनी दिली. विरोधक केवळ निवडणुकीपुरता असतो मात्र विकास कामात कुठलीही विरोधी भूमिका घेणे किंवा पक्ष विरोध म्हणून नागरिकांना सुविधेपासून वंचित ठेवणे हे काँग्रेसचे कार्य नसून सर्वसमावेशक पक्ष व विकासात्मक दृष्टिकोन असणारा पक्ष म्हणजेच काँग्रेस पक्ष व असे सुभाष धोटे लोकमत शी बोलताना म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत