Top News

छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल अपमान जनक वक्त्यव करणाऱ्या राज्यपाल कोशारी यांचा निषेध #pombhurna

पोंभुर्णा:- बहुजन प्रतिपालक ज्यांनी रयतेचे राज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराज, ज्यानी शिक्षणाचे दारे उघडले महात्मा ज्योतिबा फुले स्त्री-शिक्षणाचे जनक सावित्री फुले यांच्यावर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी सभेत भाषण देताना अपमानजनक बेताल वक्तव्य केल्याबद्दल तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध करण्यात आला. थोर महात्म्यांच्या अपमान करणाऱ्या राज्यपालांना पदावरून त्वरित खाली करा. राज्यपालाचे धिक्कार असो अशा घोषणा देऊन जाहीर निषेध करण्यात आला.
याप्रसंगी भूमिपुत्र ब्रिगेडचे श्रीकांत शेंडे व पाटील वाळके यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल प्रखर शब्दात भाष्य करून जाहीर निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणाऱ्या या राज्यात संविधानिक महत्त्वाच्या पदावर असलेल्या राज्यपाल पदावरून खाली करा. नाहीतर डॉ. अभिलाशा गावतुरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर जनआंदोलन करण्यात येईल. असा इशारा भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेतर्फे देण्यात आला. निषेध केल्यानंतर भूमिपुत्र ब्रिगेड च्या वतीने देशाचे महामहीम राष्ट्रपती यांना पोंभुर्णा तहसीलदार यांच्यामार्फत लेखी निवेदन देण्यात आले.
     
   यावेळी उपस्थित श्रीकांत शेंडे, पाटील वाळके, दयानंद गुरनुले, रुपेश चनावार, विजय झाडे, मंगेश मॅकलवार, संतोष पेंदोर, रोशन गेलकीवर,राहुल गुरनुले,चेतन गुरनुले, प्रमोद गुरनुले, रोहित आदे, बांबोळे, व भूमिपुत्र ब्रिगेडचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने