जाहिरात... Advertisement... विज्ञापन

नेफडो तर्फे महिलांचा सत्कार.

जागतिक महिला दिनानिमित्त शॉल, श्रीफळ, भेटवस्तू व वृक्ष भेट देऊन केला सत्कार.


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
राजुरा:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती डॉ. अफरोज फातेमा अमीर बेग, जिल्हा परिषद हायस्कूल राजुरा येथे गेल्या पंधरा वर्षांपासून सहाय्यक शिक्षका म्हणून कार्यरत आहेत.


 "रामकाव्य में परिवर्तित दृष्टिकोन" या विषयावर पीएचडी करून डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली. राजुरा शहरातील मुस्लिम समाजातील त्या पहिल्या डॉक्टरेट महिला आहेत. दुसऱ्या सत्कारमूर्ती रजनी देशमुख -धोटे, सेवानिवृत्त शिक्षिका. यांनी राजुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे 1960 पासून आपले विद्यादानाचे कार्य केले. केवळ साठ रुपये वेतनापासून त्यांनी आपल्या सेवेला सुरुवात केली. स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा राजुरा चे माजी आमदार, ज्यांनी राजुरा नगर परिषद मधे तब्बल तेवीस वर्ष नगराध्यक्ष पद भूषविले असे स्वर्गीय शंकरराव देशमुख यांच्या रजनीताई या कन्या आहेत. यांना नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा च्या वतीने शॉल, श्रीफळ, भेटवस्तू व वृक्ष भेट देऊन त्यांचा जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी नेफडो चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले,नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभुळकर,कला, सांस्कृतिक विकास समितीच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा रजनी शर्मा, नेफडो चे जिल्हाध्यक्ष संतोष देरकर, जिल्हा उपाध्यक्षा राजश्री उपगन्लावार, सर्वानंद वाघमारे,  भास्कर करमरकर, स्वतंत्रकुमार शुक्ला,  सचिन मोरे, ऍड. मेघा धोटे, समीर बंदाली, गुड्डू धोटे, आदींची उपस्थिती होती. शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामागिरी करीत विद्यादाणाचे कार्य करणाऱ्या शिक्षिकाचा सत्कार करणे हे नेफडो संस्थेचे कर्तव्य असल्याचे यावेळी मत व्यक्त कारण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा च्या पदाधिकारी व सभासदांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत