युवा कल्याण, सकारात्मक जीवनशैली आणि फिट इंडिया वर युवकांचे प्रशिक्षणाचा कार्यक्रम संपन्न #pombhurna

Bhairav Diwase


पोंभुर्णा:- नेहरू युवा केंद्र चंद्रपूर यांच्या वतीने चेक फुटाना येथे दिनांक 8 मार्च 2022 रोजी युवा कल्याण, सकारात्मक जीवनशैली आणि फिट इंडिया वर युवकांचे प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाला सरपंच जयश्री अर्जुनकर, उपसरपंच ईश्वर पिंपळकर, ग्रा. प. सदस्य अनुराधा गौरकर, लोकेश झाडे तसेच कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मेश्राम सर चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा, दुर्गे सर श्रीकृष्ण महाविद्यालय पोंभुर्णा, नेहरू युवा केंद्र चंद्रपूर ता. पोंभुर्णाचे स्वयंसेवक शुभम एम. कोसनकार उपस्थित हाेते. 
  आजचे युवक उद्याचे भविष्य आहेत. युवकांच्या सर्वांगीण विकासावर व देशाच्या भविष्यावर आपले योगदान कसे देता येईल व भविष्यात शिक्षण धोरणे कशी असायला हवी याचे लालित्यपूर्ण वर्णन मार्गदर्शकानी आपल्या मार्गदर्शनात केले. कार्यक्रमाला गावातील युवक व महिला उपस्थित होते.