जाहिरात... Advertisement... विज्ञापन

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिवस साजरा #Jivati

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, जिवती यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापित नारीशक्ती महिला प्रभागसंघ शेणगाव, आणि जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला अध्यक्ष सौ. चंद्रकला उईके, उद्घटक सौ. अंजनाताई पवार ( सभापती प.स. जिवती) उपस्थित होते. शाळेच्या मुलांन व समूहातील महिलांनी पथनाट्य, संगीत , नृत्य च्या माध्यमातून महिला सक्षमीकरनाचे महत्व पटवून दिले.
या प्रसंगी महिलांना त्यांचे अधिकार, महिलांकरिता राज्य घटनेत असणाऱ्या तरतुदी, उमेद अभियान अंतर्गत मिळणाऱ्या योजना,महिलांचे शासकीय योजना, महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरुद्ध कसे लढावे, महिलांनी एकत्र येऊन व्यवसाय कसा करावा, समाजातील प्रत्येक महिला सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, तंत्रज्ञान क्षेत्रात सक्षम कसे व्हावे? इत्यादि विषय सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला प्रभागसंघाचे अध्यक्ष सौ. मनीषा लांडगे, मनोज मेश्राम (BMM), बाबा कोडावे (मुख्याध्यापक) सौ. धरती टिपले, सौ. शीतल टिपले, सौ. माधुरी मडावी, सौ. मीनाक्षी कुंभरे, पंकज गोटपर्तीवार, सुरेश खोब्रागडे, सुनील राठोड, सौ. नंदाताई मुसने, सौ. वैशाली बाम्हणे सर्व ग्रामसंघाचे पदाधिकारी, समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. शीतल सोलकर आणि प्रास्ताविक सौ. मीनाक्षी कुंभरे तर आभार वैशाली बाम्हणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी करिता शाळेचे सर्व शिक्षक वृंद, ग्रामसंघाचे पदाधिकारी यांनी सहकार्य केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत