Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

जागतिक महिला दिनानिमित्त कोरोना योद्धांचा सत्कारपोंभूर्णाः- स्थानिक चिंतामणी काॅलेज ऑफ काॅमर्स, तसेच चिंतामणी महाविद्यालय पोंभूर्णा यांच्या अंतर्गत तक्रार निवारण समिती तथा राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ठाणेदार धर्मेंद्र जोशी, नगराध्यक्षा सौ. सुलभा पिपरे, तहसिलदार शुभांगी कनवाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे यांचा कोरोना योद्धा म्हणून पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून त्यांचा गौरव करण्यात आला. पोलीस विभागातील कोरोना योध्दा म्हणून सौ. शोभना सुरे, सौ. मीनाक्षी गेडाम, सौ. भुजबाना पठाण, सौ. प्रियका वाढई, सौ अनिता खडसे, तसेच प्राथमिक आरोग्य विभागाच्या डॉ. वंदना बावणे, डॉ. नेहा वैध, सौ छाया शेकरी, सौ. ताराा लिंगमवार, सौ. अरूणा आत्राम यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून त्यांचा गौरव करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. संघपाल नारनवरे, प्राचार्य डाॅ. एन. एच. पठाण, मुख्य अतिथी सरदार महाविद्यालय चंद्रपूर मराठी विभाग प्रोफेसर पद्मरेखा धनकर, तसेच महाविद्यालयीन प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिकक्षोत्तर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शितल सोनटक्के आणि प्रास्ताविक प्रा. डॉ. पूर्णिमा मेश्राम तर आभार युवराज सिडाम यांने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी करिता महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका, शिकक्षोत्तर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहकार्य केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत