Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

युवकांनी वन संरक्षणासाठी जागरूक व्हावे:- आम्रपाली खोब्रागडे #pombhurna


पथनाट्याच्या माध्यमातून वनांच्या सुरक्षीततेसाठी जनजागृती
पोंभुर्णा:- जागतीक वन दिवसाचे औचित्य साधून वन परिक्षेत्र पोंभूर्णा तथा चिंतामणी काॅलेज ऑफ काॅमर्स पोंभूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम पंचायत आष्टा येथे जागतिक वन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतासारख्या जगातील सर्वात युवा देशातील युवकांनी वन संरक्षणासाठी जागरूक व्हावे. वन सुरक्षा करणे अर्थात देशकार्य असून समाज हिताचे कार्य आहे. युवकांनी सुजाण नागरीकाप्रमाणे आपले नैतिक कर्तव्य जाणून घ्यावे व वनांच्या जैवविविधतेचा व सौदर्याचा सांभाळ करावा. असे वन अधिकारी आम्रपाली खोब्रागडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमात पथनाट्य, नाटक, कला इत्यादींच्या माध्यमातून वनांच्या सुरक्षीततेसाठी जनजागृती कार्यक्रमाचे सादरीकरण पुर्वी बहुउद्देशीय संस्था पोंभूर्णा यांनी केले. यावेळी प्रभारी प्राचार्य डाॅ. संघपाल नारनवरे यांनी गावकऱ्यांनी नजीकच्या जंगलाची सुरक्षा करण्यासाठी जागरूक व्हावे असे आवाहन केले.
यावेळी सरपंच किरण डाखरे, उपसरपंच रमेश कुंभरे प्रा. ओमप्रकाश सोनोने, डाॅ. पुर्णिमा मेश्राम, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन उपरवट, प्रा. विजय बुधे, पंकज अनंतुलवार, अजय घडले, विशाल कटकमवार, ग्रामसेवक मनोज मुडावार, सदस्य गिरीधन तोरे, विजय बोडेकर, कुंदा दिवसे, अर्चना दिवसे, अतनल मोरे, प्रदिप दिवसे यांच्यासह गावातील अनेक नागरीक उपस्थित होते. रासेयो स्वयंसेवक, स्वयंसेविका तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत