Click Here...👇👇👇

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत संगिता गुरुदास कामडी यांना चतुर्थ क्रमांकाने सन्मानित #Chandrapur

Bhairav Diwase
ऑनलाइन शिक्षणाच्या धर्तीवर इयत्ता ५ वी, ८ वी करिता शिष्यवृत्ती परीक्षा सराव या विषयावर नवोपक्रम सादर

चंद्रपूर:- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विविध संवर्गातून निवडलेल्या नवोपक्रमशील शिक्षक, विषय साधनव्यक्ती, अधिकारी यांचे बक्षिस वितरण समारोहाचे दिनांक १५ मार्च २०२२ रोजी पुणे येथे आयोजन करण्यात आले होते.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम.डी.सिंह, जेष्ठ शिक्षण तज्ञ ह.ना.जगताप, एससीईआरटी चे डॉ. विकास गरड,डॉ. कमलादेवी आवटे, डॉ. नेहा बेलसरे, संशोधन विभागाचे डॉ. अमोल डोंबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
चंद्रपूर जिल्ह्यातून गट साधन केंद्र यशवंतनगर चंद्रपूर, पंचायत समिती चंद्रपूर येथील विषय साधनव्यक्ती सौ.संगिता गुरुदास कामडी यांनी शिष्यवृत्ती शुक्रवार इयत्ता ५ वी, ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वतयारी ,सराव ऑनलाइन पद्धतीने कशी करावी या विषयावर नवोपक्रम सादर केला होता. संगिता कामडी यांचा वरील नवोपक्रम विभाग स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केल्यानंतर राज्य स्तरावर निवड होऊन त्याचे सादरीकरण करण्यात आले.
 राज्य स्तरावर संगिता कामडी यांनी चतुर्थ क्रमांक प्राप्त करून नवोपक्रम स्पर्धेत चंद्रपूर जिल्हयाला मानाचे स्थान प्राप्त करून दिले आहे.संगिता कामडी यांनी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत विषय सहाय्यक व साधन व्यक्ती गटातून यश प्राप्त केल्या बद्द्ल संगिता कामडी यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम.डी.सिंह, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ ह.ना.जगताप, एससीईआरटी चे डॉ. विकास गरड,डॉ. कमलादेवी आवटे, डॉ. नेहा बेलसरे, संशोधन विभागाचे डॉ. अमोल डोंबाळे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
संगिता कामडी यांनी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत मिळविलेल्या यशा बद्द्ल डायट चंद्रपूर चे प्राचार्य धनंजय चापले सर, जेष्ठ अधिव्याख्याता राजकुमार हिवारे सर, गटशिक्षणाधिकारी बाबुराव मडावी सर आदिनी अभिनंदन केले आहे.