Top News

चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे प्राणीशास्त्र विभागातर्फे जागतिक चिमणी दिवस तसेच जागतिक वनीकरण दिवस साजरा



पोंभुर्णा:- आज दिनांक 21 मार्च 2022 ला चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे प्राणीशास्त्र विभागातर्फे "जागतिक चिमणी दिवस" तसेच "जागतिक वनीकरण दिवस" साजरा करण्यात आला. चिमणी दिवस व वनीकरण दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना विविध प्रजातींचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच वनाचे महत्त्व सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांसाठी "I LOVE SPARROW" या विषयावर  स्पर्धा ठेवण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी चिमण्यांसाठी खूप सुंदर घरटी  बनवून आणले. तसेच चिमण्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी जलपात्र सुद्धा आणले. "चिमणी संवर्धन" या विषयावर विद्यार्थ्यांनी पोस्टर्स सुद्धा बनवून आणलेत. प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अनंत देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना चिमण्यांचे संवर्धन का केले पाहिजे? यावर माहिती दिली. डाँ. हुंगे यांनी मानव आणि निसर्गातील प्रजाती यातील नातं विद्यार्थ्यांपुढे मांडलं. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ वेगिंनवार सर यांनी विद्यार्थ्यांना वनसंवर्धनावार मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी कॉलेजच्या प्रांगणामध्ये असलेल्या झाडांवर पक्षांसाठी विद्यार्थ्यांच्या हस्ते जलपात्र बांधण्यात आलेत. कार्यक्रमाचे आयोजन डाँ. वैशाली मुरकुटे यांनी केले तर आभार कु. दिव्या कस्तुरे हिने मानले. स्पर्धेचे मूल्यांकन डॉ. हुंगे आणि डॉ. वेगिंनवार यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने