Top News

जागतिक चिमणी दिनानिमित्त जनजागृती व पक्षीघागर वाटप #Bhadrawati

भद्रावती:- भद्रावती तालुका इको-प्रो संघटनेतर्फे जनजागृती व पक्षीघागर वाटप करुन जागतिक चिमणी दिन नुकताच साजरा करण्यात आला. दरवर्षी २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो.
याप्रसंगी उपस्थितांना चिमण्यांचे निसर्गात असलेले महत्व पटवून देण्यात आले व पुढे चिमणी संवर्धनाकरिता वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला.
मागील काही वर्षांच्या काळात आपल्या घराच्या अंगणात दाणे टिपणारी चिमणी कुठे हरपली हे कळण्याच्या आधीच चिमण्यांची संख्या अतिशय खालावली. वाढत्या शहरीकरणामुळे, जंगलाच्या तोडीमुळे, शेतीजन्य शिवार कमी झाल्यामुळे व घरांच्या बदललेल्या रचनेमुळे दिवसेंदिवस चिमण्यांच्या संखेत कमालीची घट झालेली पाहावयास मिळत आहे. अचानक कमी झालेली चिमण्यांची संख्या लक्षात घेता सन २००९ पासून चिमणी वाचविण्याचा हालचाली सूरू करण्यात आल्या. चिमण्यांच्या संवर्धना बाबत जनजागृती करण्याकरिता सन २०१० मध्ये दिल्ली येथे पहिल्यांदा जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला.
            याच मोहिमेला समोर नेण्याकरिता व चिमण्यांचे संवर्धन करण्याकरिता इको-प्रो भद्रावती तर्फे मागील वर्षापासून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. ज्यामध्ये नागरिकांना आपण आपल्या घराच्या आवारात चिमण्यांना चारा व पिण्याचे पाणी ठेवण्यासोबतच त्यांना राहण्या करिता कृत्रीम घरटे सुद्धा ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
           रोज सकाळी दार उघडताच चिव चिव करणारी चिऊताई आता शहरी भागा सोबतच ग्रामीण भागातून सुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या चिऊताई चे संवर्धन करण्याची  जवाबदारी आपणा सर्वांवर आली असल्याची भावना जनजागृती इको-प्रो भद्रावती तर्फे करण्यात येत आहे. सदर मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करून आपापल्या घराच्या आवारात जागा मिळेल तिथे चिमण्यांकरिता अन्न, पाणी व घरट्यांची व्यवस्था करावी असे आवाहन करण्यात येत आहे.  
     सदर कार्यक्रमास इको-प्रो संघटनेचे भद्रावती तालुका अध्यक्ष संदीप जीवने, किशोर खंडाळकर, हनुमान घोटेकर, अमोल दौलतकर, मंगेश पढाल, प्रवीण दौलतकर, दीपेश गुरनुले, संग्राम पढाल व स्थानिक नागरिक उपास्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने