जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे मौलिक कार्य साधत गावचा समतोल विकास साधेल #Rajura

जन सामान्य चे नेतृत्व, लोकासाठी सुरू केलेल्या कामासाठी सदैव तत्पर:- रवी गायकवाड

रवि गायकवाड यांच्या मागणी ला यश
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- चुनाळा ग्रामपंचायतला कुषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत चुनाळा ला सदस्य रवि गायकवाड यांच्या मागणी नुसार जिल्हा निधी अंतर्गत आरो (RO) मंजूर करण्यात आलेला असुन सदर आरो ची पुर्तता येत्या काही दिवसांत पुर्ण होईल. मौलिक कार्य करित गावाचा सर्वागीण विकास साधेल असे जिल्हा परिषद सभापती यांनी सांगितले.
चुनाळा ग्रामपंचायतला या पुर्वी आरो (RO) देण्यात आलेला होता, पंरतु काही कारणास्थत्व रद्द झालेला होता, त्यामुळे गावात असंतोष निर्माण झालेला असल्याने गावकऱ्यांनी आरोची मागणी ग्रामपंचायत सदस्य रवी गायकवाड यांना केली. त्या मागणी ची दखल घेत रवी गायकवाड यांनी ही मागणी जिल्हा परिषद सभापती यांच्या कडे केली.
त्याच उपरोक्त ही मागणी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर व माजी आमदार अँड. संजय धोटे यांचे कडे करण्यात आली. या सर्वाच्या माध्यमातून उपरोक्त निधी मिळण्यास सहकार्य लाभले.
सतत जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे यांना हि मागणी करित नेहमी त्या संदर्भात पाठ पुरावा करित ह्या मागणी ला रेटून धरून झालेच पाहिजे या आशेने सतत प्रयत्नशील होते. या करिता वेळोवेळी पाठपुरावा केल्याने ही मागणी आज पुरत्वास आली आहे.
अखेर आज हि मागणी यशस्वरुप फलदायी आली असून जिल्हा निधी अतर्गत आरो मंजूर झालेला आहे. उपरोक्त आरो ला सात लक्ष रुपये मंजूर जिल्हा निधी अतर्गत उपरोक्त निधी देण्यात आलेली आहेत. यात सर्वश्री यश ग्रामपंचायत सदस्य रविजी गायकवाड याचे आहेत.
ग्रामपंचायत सदस्य रवि गायकवाड यांनी जिल्हा परिषद चंद्रपूर सभापती सुनील उरकुडे व अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर सौ. संध्याताई गुरुनुले व माजी आमदार संजय धोटे राजुरा विधानसभा क्षेत्र तसेच इतर मान्यवराचे आभार व्यक्त केले. उपरोक्त आरो करिता ग्रामपंचायत सरपंच बाळु वडस्कर व इतर सदस्य यांनी ठराव व इतर प्रक्रिया करिता सहकार्य केल्याने त्याचे सुध्दा आभार व्यक्त केले.
गावातील जनतेला आरो चा लाभ झालेला असल्याने गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गावातील नागरिकांच्या वतीने सर्वत्र ग्रामपंचायत सदस्य रविजी गायकवाड त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
रवि गायकवाड यांनी लोकासाठी सुरू केलेल्या कामाला आपण नेहमी स्वार्थक करू असे या वेळी सागितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत