विद्यार्थी गुरुजनांची वाट पाहून घरी परतले #school #teacher

Bhairav Diwase
गुरुजी १२ वाजेपर्यंत शा आलेच नव्हते
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुका हा अतिदुर्गम आदिवासी भाग असल्याने शासन प्रशासनाचे या आदिवासी अतिदुर्गम जिवती तालुक्याकडे विशेष दुर्लक्ष असल्याचे समजते आज दि. २/२/२०२२ रोजी पंचायत समिती जिवती केंद्र पाटण अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हटकरगुडा (आंबेझरी) हि शाळा बंद असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे यांनी दुरध्वनी वरुन माहिती दिली. विद्यार्थी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर गुरुजीची वाट पाहत ताटकळत उभे होते. गुरुजी १२ वाजेपर्यंत आले नसल्याचे पाहून विद्यार्थी घरा कडे परत निघून गेले अशी माहिती प्राप्त झाली.

🌃

कोरोना महामारी मुळे शाळा बंद होते. हल्ली शाळा सुरू झाले असल्याने पालक आपल्या पाल्यांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत पाठवू लागले आहेत. विद्यार्थी शाळेत धडे गिरवायला शाळेत येत असलेल्याचे दिसून येत आहे. आज ही रोज प्रमाणे हटकरगुडा येथील विद्यार्थी शाळेत गेले असता शाळा बंद असल्याचे पाहून गुरुजीची वाट पाहत ताटकळत उभे राहिले. गुरुजी १२ वाजेपर्यंत आले नसल्याचे पाहून विद्यार्थी घरा कडे निघून गेले. अश्या प्रकारे शाळेला बुट्टी मारणाऱ्या जि. प. प्राथमिक शाळा हटकरगुडा या शिक्षकावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले व
केंद्र प्रमुखांशी संपर्क साधून हटकरगुडा येथील शाळा बंद असल्याबद्दल माहिती विचारली असता केंद्र प्रमुख पवार सरांनी उत्तर समाधानकारक दिले नाही. मी आता दुसऱ्या शाळेचे एक शिक्षक पाठवून देतो असे सांगितले. बातमी लिहीत पर्यंत शिक्षक शाळेत आले नसल्याची माहिती आहे