Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

बालकासोबत कुकर्म करणाऱ्या नराधमाला जमावाने झोडपले #sindewahi


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:-आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला जमावाने झोडपून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना काल रात्री साडेआठ सिंदेवाही बसस्थानक नजीक हाटेल मनमंदीर मध्ये घडली.
🖤
सविस्तर वृत्त असे की काल (दि. 28) महात्मा फुले चौकातील तिसऱ्या वर्गात शिकणारा मनीष आणि स्वागत हे दोघेही घराजवळ खेळत होते. यावेळी थामदेव मेंढूळकर वय 41 रा. नागपूर हा व्यक्ती त्या मुलांना मी तुमच्या घरचा पाहुणा आहे चला तुम्हाला चप्पल व घड्याळ घेऊन देतो अस सांगून सोबत घेऊन गेला. चप्पल च्या दुकानात त्यांना सॅंडल घेऊन दिली व बस स्टँड च्या बाजूला असलेल्या मनमंदिर हॉटेलमध्ये रूम नंबर 102 मध्ये निघून गेला. तिथे गेल्यानंतर त्यांनी त्या बालकांना कपडे काढायला लावले. त्यांच्यासोबत दुष्कृत्य करायला सुरुवात केली. स्वागत नावाच्या मुलाने मला संडास लागली असे सांगून नराधमाच्या तावडीतून सुटका केली.
संध्याकाळ झाली तरी मुले घरी आली नाहीत म्हणून आईवडिलांची शोधा शोध सुरू झाली. बस स्टँड जवळ मुलांची शोध घेत असताना घाबरलेल्या अवस्थेत स्वागत येताना दिसला. स्वागतला विचारणा केली असता त्याने मनीष हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले. मनीषा चे वडील किशोर देविदास आदे वय 37 यांनी त्या मुलाला घेऊन रूम नंबर 102 च्या दारावर थाप दिली. परंतु दरवाजा उघडल्या जात नव्हता. हॉटेल मालकाला सांगण्यासाठी किशोर खाली उतरत असताना गावातील मिथुन मेश्राम, अमन भाई व इतर वर येताना दिसले. सर्वांनी पुन्हा एकदा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा दरवाजा उघडला गेला. मनीष रडत असल्याचे दिसून आले. त्याने आपल्या वडिलांना व इतरांना आप बीती सांगितले.
🎂
संतापलेल्या जमावाने आरोपीला चांगलेच झोडपून काढले व पोलिसांच्या स्वाधीन handover to policeकेले. आरोपीचे वीस वर्षांपूर्वी सलून चे दुकान सिंदेवाही असल्याचे समजते. आरोपीविरुद्ध भादवि कलम 363, 377, बालकांचे लैंगिक अपराध यापासून संरक्षण अधिनियम कलम सहा नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलेली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत